मुंबईत रात्रभर पावसाची संततधार सुरुच, सखल भागात पाणी साचले, रेल्वे वाहतूक उशिराने

मुंबईकरांसाठी पुढील तीन ते चार अतिशय महत्त्वाचे असल्याचे हवामान खात्याने म्हटलेय. कारण या काळात समुद्राला मोठी भरती असणार आहे, परिणामी मुंबईची तुंबई होऊ शकते, असं बोललं जात आहे.

Mumbi Rain – पावसाबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता असून, पुढील २-३ दिवस राज्यातील काही भागात म्हणजे कोकण व घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासापासून मुंबईसह राज्यभर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, मुंबई, उपनगर कोकण आणि घाट माथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढील 24 तास मुसळधार व अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे .

मध्य रेल्वेची 30-40 मिनिटे वाहतूक उशिरा

मुंबईकरांसाठी पुढील तीन ते चार तास महत्त्वाचे असणार आहेत. मुंबई पावसाची रात्रभर बॅटिंग सुरु आहे. दुसरीकडे काल दिवसभर पावसाने मुंबईसह उपनगरात जोरदार बॅटिंग केली. तर कालपासून सुद्धा रात्रभर मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. यामध्ये दादर, सायन, हिंदमाता, वरळी, परेल, कुर्ला, अंधेरी सबवे आदी ठिकाणी पाणी साचले आहे. या मुसळधार पावसाचा रस्ते वाहतुकीवर आणि रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची 30 ते 40 मिनिटे वाहतूक उशिरा धावत आहे. 

मुंबईकरांसाठी ४-५ तास महत्त्वाचे…

मुंबईत गेल्या १२ तासात २२० मिमी पाऊस पडला आहे. तसेच मुंबईसाठी पुढील चार ते पाच तास महत्त्वाचे आहे. दुसरीकडे गेल्या 24 तासापासून मुंबई संततधार पाऊस पडत असल्यामुळे काल दुपारनंतर शाळांना सुट्टी देण्यात आली आहे तर आज 19 ऑगस्टला मुंबईसह, ठाणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर समुद्रात उंच लाटेचा देखील इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचना प्रशासाकडून देण्यात आल्या आहेत. तर मुंबईकरांसाठी पुढील तीन ते चार अतिशय महत्त्वाचे असल्याचे हवामान खात्याने म्हटलेय. कारण या काळात समुद्राला मोठी भरती असणार आहे, परिणामी मुंबईची तुंबई होऊ शकते, असं बोललं जात आहे.

दोन दिवस शाळांना सुट्टी जाहीर…

या पावसामुळे मुंबई, ठाण्यातील दोन दिवस शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर राज्यातील अनेक भागात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळं रस्त्यावरील वाहतुक संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कार्यालय गाठताना उशीर होत आहे. मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाचा परिणाम अनेक ठिकाणी दिसत आहे. पावसामुळं मुंबई विद्यापीठांच्या आज होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.


About Author

Astha Sutar

Other Latest News