‘फेविकॉल का जोड’ पासून ‘दो बूंद जिंदगी के…’ पर्यंत, जाहिरात गुरू पियुष पांडे यांचे हे प्रसिद्ध स्लोगन

Jitendra bhatavdekar

भारतीय जाहिरातविश्वातील प्रसिद्ध नाव पीयूष पांडे आता आपल्यात राहिले नाहीत. त्यांच्या सर्जनशीलतेने जाहिरातींच्या जगाला नवी ओळख दिली आणि हिंदी भाषेला तिचं आत्मभान दिलं. त्यांच्या विचारांनी ब्रँड्सना केवळ बाजारापर्यंतच नाही, तर लोकांच्या मनापर्यंत पोहोचवलं. साध्या आणि दैनंदिन बोलचालीच्या भाषेत कथा सांगण्याच्या त्यांच्या शैलीमुळे जाहिरात ही एक कलारूप बनली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक अविस्मरणीय जाहिराती निर्माण केल्या, ज्या आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत.

त्यांच्या क्रिएटिव विचारसरणीने केवळ जाहिरातविश्वाची दिशा बदलली नाही, तर भारतीय ब्रँड्सना भावनांशी जोडून टाकलं. जे लोक कदाचित त्यांना नावाने ओळखत नसतील, त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत पीयूष पांडे यांचे आयकॉनिक जाहिराती  ज्या आज भारतीय जाहिरात उद्योगाची ओळख बनल्या आहेत.

फेविकॉल ट्रकची जाहिरात

फेविकॉलचा ट्रक वाला जाहिरात 2007 साली पियूष पांडे यांनी तयार केला होता, ज्यामध्ये फेविकॉलसारख्या सामान्य उत्पादनाला भावनांशी जोडले गेले. जाहिरातीत एक ट्रक असतो जो उबळ-खवळ रस्त्यांवर जातो, पण वर बसलेले लोक पडत नाहीत. त्याची टॅगलाइन होती ‘‘फेविकॉल का जोड़ है, टूटेगा नहीं..’ या साध्या कॉन्सेप्टने ब्रँडला घराघरात ओळख मिळवून दिली. या जाहिरातीत फक्त उत्पादन विकले गेले नाही, तर फेविकॉल मजबूत नात्यांचे प्रतीक बनला. याला अनेक पुरस्कारही मिळाले आणि हा भारतीय जाहिरात इतिहासातील एक क्लासिक बनला.

कॅडबरीची क्रिकेट जाहिरात

२००७ ची ही जाहिरात अजूनही लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणते. एका मुलाने क्रिकेटमध्ये षटकार मारला आणि संपूर्ण परिसर त्याच्यासोबत नाचतो. पियुष पांडेचा जादुई आवाज आणि “कुछ खास है जिंदगी में!” या टॅगलाइनने या जाहिरातीत भावनांचा ओघ निर्माण केला. यामुळे कॅडबरी केवळ चॉकलेटच नाही तर आनंद आणि उत्सवाचे प्रतीक बनली.

एशियन पेंट्स ‘हर घर कुछ कहता है’.

2002 मध्ये आलेल्या या जाहिरातीत एका कुटुंबाच्या आठवणींनी भरलेली कथा मांडली होती. भिंतींवर लावलेल्या जुन्या फोटो, वडिलांची आठवण, आणि पेंटच्या रंगांमध्ये दडलेली भावना  हे सगळे एकत्र करून जाहिरात तयार केली गेली. टॅगलाइन होती, ‘हर घर कुछ कहता है’. ही जाहिरात प्रत्येक भारतीय घराचा भाग बनली आणि एशियन पेंट्सला मार्केटमध्ये लीडर बनवून दिले.

हच (वोडाफोन) ‘पग’वाली जाहिरात

ताज्या बातम्या