दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सारखा ब्रिटनच्या रम्य निसर्गात चित्रीत झालेला रोमँटिक सिनेमा आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यशराज फिल्म्स आणि युनायटेड किंगडम सरकारमध्ये झालेल्या नव्या करारानंतर, पुढच्या वर्षीपासून (२०२६) YRF च्या तीन भव्य हिंदी चित्रपटांची शूटिंग यूकेमध्ये होणार असल्याची घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी नुकतीच केली.
यशराजचा ऐतिहासिक टप्पा २० वर्षांचा प्रवास
यशराज फिल्म्सने १२ ऑक्टोबर २०२५ रोजी इंडस्ट्रीमध्ये आपल्या २० वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहे. यानिमित्त, यशराज आणि ब्रिटनमधील ही भागीदारी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून, ती दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक आणि आर्थिक नात्यांना बळकटी देणार आहे.

रोजगाराची मोठी संधी
पंतप्रधान स्टार्मर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत सांगितले की, या नव्या कोलॅबरेशनमुळे ब्रिटनमध्ये सुमारे ३००० रोजगार निर्माण होतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला लाखो पाउंड्सचा फायदा होईल. हे केवळ सिनेमाचं नाही, तर आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगतीचं मोठं पाऊल आहे.
मुंबई दौऱ्यात रानी मुखर्जीची भेट
स्टार्मर यांचा मुंबई दौरा यशराज स्टुडिओपासून सुरू झाला. त्यांनी अभिनेत्री रानी मुखर्जी यांची खास भेट घेतली. तसंच स्टुडिओमध्ये एक खास प्रायव्हेट स्क्रीनिंगमध्ये सहभागी होत बॉलिवूडच्या तांत्रिक बाजूंशी थेट संवाद साधला.
पुन्हा दिसेल ब्रिटनचं सौंदर्य, DDLJ स्टाईलमध्ये
२९ वर्षांपूर्वी ‘DDLJ’ मध्ये पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर ब्रिटनचं सौंदर्य भारतीय प्रेक्षकांसमोर आलं होतं. आता तेच DDLJ सारखं रोमँटिक सौंदर्य पुन्हा एका नव्या युगात दिसणार आहे. यशराजच्या इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये PM स्टार्मर ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ हे गाणं ऐकताना भावूक होताना दिसले.
काय आहे पुढे?
यशराज फिल्म्स लवकरच त्यांच्या या तीन नव्या प्रोजेक्ट्सची अधिकृत घोषणा करणार आहे. या चित्रपटांत कोणते स्टार्स असतील, कथा काय असेल, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
DDLJ (1995): ब्रिटन व स्वित्झर्लंडमध्ये चित्रित, शाहरुख-काजोलची क्लासिक प्रेमकथा आहे. YRF + UK 2026 पासून 3 बिग-बजेट फिल्म्सची शूटिंग ब्रिटनमध्ये करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे रोजगार 3000 हून अधिक लोकांना थेट नोकरीची संधी मिळणार आहे. शिवाय भारत-ब्रिटन सांस्कृतिक संबंधांना नवे बळ मिळणार आहे.
यशराज फिल्म्स आणि ब्रिटन सरकारमधील ही भागीदारी फक्त सिनेमांची नाही, तर दोन संस्कृतींना एकत्र आणणाऱ्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. आता पाहायला हवं, की ‘राज-सिमरन’चा वारसा पुढे कोण घेणार?