Dharmendra Passed Away : बॉलिवूडच्या सुवर्णकाळात स्वतःची स्वतंत्र छाप सोडणारे आणि ‘हीमॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज निधन झाले आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देशभरातून त्यांच्यासाठी अभिवादन करण्यात येत आहे. धर्मेंद्र यांचा जन्म एका पंजाबी जाट कुटुंबात झाला. त्यांच्या जन्मानुसार, धर्मेंद्र हिंदू होते. धर्मेंद्र हे नाव बहुतेकदा मुलांना दिले जाते. परंतु तुम्हाला धर्मेंद्र या नावामागचा अर्थ माहितीये का?? नसेल तर आज आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो.
धर्मेंद्र या नावाचा अर्थ काय (Dharmendra Passed Away)
धर्मेंद्र हे एक हिंदू नाव आहे. धर्मेंद्र या नावाचा अर्थ “धर्माचा राजा” किंवा “धर्माचा स्वामी” असा होतो. धर्मानुसार जगणाऱ्यांना धर्मेंद्र म्हणतात. हे भारतात एक लोकप्रिय नाव आहे. धर्मेंद्र हे नाव “धर्म” आणि “इंद्र” या दोन संस्कृत शब्दांपासून बनले आहे. हे नाव प्रामाणिक, विश्वासार्ह आणि दयाळू मानले जाते.

धर्मेंद्र यांचे खरे नाव धर्मसिंह देओल
ज्योतिषशास्त्र असे सांगते की ज्या लोकांची नावे “ड” अक्षराने सुरू होतात ते मीन असतात. अंकशास्त्रात, हे अक्षर ‘४’ हे अंक दर्शवते, जे राहूचे प्रतीक मानले जाते. मीन ही सर्वात दयाळू राशींपैकी एक आहे. धर्मेंद्र यांचे खरे नाव धरम सिंह देओल आहे, परंतु त्यांनी कधीही त्यांचे आडनाव वापरले नाही. धर्मेंद्र यांनी नेहमीच स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणून वर्णन केले.
धर्मेंद्र यांनी त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीत कधीही त्यांचे आडनाव वापरले नसले तरी, त्यांची सर्व मुले आडनाव वापरतात. धर्मेंद्र सारखे कलाकार स्वतःला कोणत्याही जाती किंवा समुदायापुरते मर्यादित ठेवू इच्छित नव्हते. आडनाव वापरल्याने जाती आणि समुदायाची जाणीव होते. धर्मेंद्र असं वाटतं होतं की,ते एक कलाकार आहेत आणि कलाकारांची ओळख विशिष्ट जाती किंवा समुदायाद्वारे होत नाही.