बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी (Disha Patani House Firing) एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. दिशाच्या घरावर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींनाउत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स (STF) ने अटक केली आहे. गाझियाबादच्या ट्रोनिका सिटीमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान ही अटक करण्यात आली. या चकमकीमध्ये दोन्ही आरोपी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपींची नावे काय आहेत??
या घटनेची जबाबदारी कॅनडा-स्थित कुख्यात गँगस्टर गोल्डी बरार आणि त्याचा साथीदार रोहित गोदारा यांनी सोशल मीडियावरून आधीच घेतली होती.. सदर दोन्ही आरोपी हे या स्टोरीचे सक्रिय सदस्य असल्याचे स्पष्ट झाल आहे. एटीएस ने दिलेल्या माहितीनुसार रवींद्र उर्फ कल्लू आणि अरुण असे या आरोपींची नावे आहेत. यातील रवींद्र हा रोहतकमधील कहानी गावचा रहिवासी आहे, तर अरुण हा सोनीपतमधील गोहाना येथील आहे. रवींद्र अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाँटेड आहे. या चकमकीदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ग्लॉक आणि झिगाना पिस्तूल आणि अनेक जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

कधी झाला गोळीबार?? Disha Patani House Firing
१२ सप्टेंबर रोजी पहाटे ३:४५ वाजता दिशा पटानीच्या उत्तर प्रदेशातील सिव्हिल लाईन्स परिसरातील दिशाच्या वडिलांचे घर, जेथे रिटायर्ड डिप्टी एसपी जगदीश पाटनी वास्तव्यास आहेत, त्या घराच्या मुख्य दरवाज्यावर आणि भिंतीवर चार ते पाच गोळ्या झाडल्या (Disha Patani House Firing). सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु संपूर्ण परिसरात दहशत पसरली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आणि तात्काळ चौकशी आणि कठोर कारवाईचे आदेश दिले होते. अखेर आज दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यास यश आले आहे. उत्तर प्रदेश पोलीस या आरोपींची कसून चौकशी करत असून आणखी काही धागेदोरे सापडतायेत का याकडे लक्ष लागल आहे.











