ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेकने पहिल्यांदाच सोडलं मौन; म्हणाला…

अभिषेक बच्चननं अखेर ऐश्वर्या रायसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं असून त्यानं एका शब्दातच त्यांच्या नातातलं सत्य सांगितलं आहे.

बॉलिवूडच्या स्टार कपल्सपैकी एक असलेलं कपल म्हणजे, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन. पण, गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या  या कपलमध्ये फारसं काही ठीक नसल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. एवढंच नाहीतर, दोघंही लवकरच घटस्फोट घेणार असल्याचंही बोललं जात होतं. ऐश्वर्या रायसोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने मोकळी प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो ट्रोलिंगबद्दलही व्यक्त झाला. सोशल मीडियावर सतत होणाऱ्या चर्चांबद्दल अभिषेकने त्याचं परखड मत मांडलं आहे…

अभिषेक बच्चन घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलला 

ई टाईम्सशी बोलताना,अभिषेक बच्चन म्हणाला की, तो बहुतेकदा त्याच्याबद्दल पसरणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करतो, पण आता ही बाब त्याच्यासाठी अत्यंत चिंतादायक ठरतेय. कारण, जेव्हा तुम्ही बराच काळ एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता, तेव्हा लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो.

अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले की, “माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या आयुष्याबद्दल आणि माझ्या नात्याबद्दल ज्या गोष्टी बोलल्या जातात, त्या पूर्णपणे निराधार आहेत. माझ्या कुटुंबाला आणि माझ्या नात्याला या गोष्टींचा त्रास होतो.” तो पुढे म्हणाला, “माझ्यासाठी माझे कुटुंब सर्वात महत्वाचे आहे. माझ्या आई आणि पत्नी यांच्याबद्दल जे काही बोलले जाते, ते मला अजिबात आवडत नाही. मी माझ्या कामावर आणि माझ्या कुटुंबावर लक्ष केंद्रित केले आहे.” 

अशा अफवा खूप वेदनादायी असतात 

अभिषेक बच्चन पुढे म्हणाला की, “अशा अफवा तुम्हाला खूप त्रास देतात. तुम्ही मला ओळखत नाही, तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल काहीच माहिती नाही, पण तरीही तुम्ही एका कम्प्युटरच्या मागे बसून एखाद्यासाठी काहीही वाईट लिहिणं योग्य नाही, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. अफवा लहान असो वा मोठी, त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो. अभिनेता म्हणतो की, अशा बातम्यांचा फक्त माझ्यावरच नाही तर माझ्या कुटुंबावरही परिणाम झाला आहे.” तसेच, पुढे बोलताना अभिषेक बच्चननं प्रश्न विचारला आहे. अभिषेक म्हणतो की, जर कोणी तुमच्यासोबत असं केलं तर तुम्हाला कसं वाटेल?

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News