मराठी सिनेविश्वात मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर त्यांच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आल्या आहेत. त्या सोशल मीडियावर विशेष सक्रिय असल्याने ऐश्वर्या यांच्या अनेक पोस्ट व्हायरल होतात.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर
मराठमोळ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर त्यांच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखल्या जातात. ऐश्वर्या आणि त्यांचे पती अविनाश नारकर हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर ते सतत रील्स आणि फोटो पोस्ट करत नेटकऱ्यांचं मनोरंजन करतात. ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच काही फोटो पोस्ट केले असून त्यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांना त्यांच्या ड्रेसिंग स्टाइलवरून ट्रोल केलंय.

लेटेस्ट फोटोशूट
ऐश्वर्या यांनी अलीकडेच प्लाजो पॅन्ट आणि हॉल्टर नेक बॅक ओपन क्रॉप टॉपमध्ये फोटोशूट शेअर केले. ‘जेव्हा तुमची वेस्टलाइन तुम्हाला व्यायाम करण्यासाठी प्रेरणा देते…’, असे कॅप्शन देत त्यांनी हे फोटोशूट शेअर केले. या फोटोशूटसंदर्भात त्यांनी इतरही काही पोस्ट केल्या केल्या आहेत.
तुम्हाला शोभतं का? चाहत्यांच्या प्रतिक्रिया
ऐश्वर्या नारकर यांच्यावर नेटकरी नाराज मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना त्यांच्या लूकमुळे काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय. इन्स्टाग्रामवरील या फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॅकलेस टॉप आणि पँटवर त्यांनी हे फोटोशूट केलंय. काही नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ‘ताई तुम्हाला शोभत नाही, आपली संस्कृती नका विसरू’, असं एकाने म्हटलंय. तर ‘आपण एक नावाजलेल्या अभिनेत्री आहात, हे तुम्हाला शोभत नाही. या वयात तर नाहीच नाही’, असं दुसऱ्याने लिहिलंय.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)