‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची आजही प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या कार्यक्रमात प्रभाकर मोरे अनेकदा कोकणी माणसाची भूमिका साकारतात. प्रभाकर मोरे यांच्या ‘अगं शालू झोका देगो मैना…’ गाण्यावर गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी ठेका धरला, त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सुवर्ण भास्कर नमन स्पर्धा 2025
सुवर्ण भास्कर नमन स्पर्धा 2025 या स्पर्धेचं आयोजन आमदार भास्कर जाधव यांनी केलं होतं. यावेळी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे उपस्थित होते. यावेळी भास्कर जाधव यांनी प्रभाकर मोरे यांच्यासोबत स्टेजवर ‘अगं शालू झोका देगो मैना….’ या गाण्यावर ठेका धरला. या स्पर्धेतील स्पर्धक आणि प्रभाकर मोरे, भास्कर जाधव स्टेजवर आहेत.

आमदार भास्कर जाधव
शिवसेना नेते, गटनेते, आमदार भास्कर जाधव यांच्या संकल्पनेतून गुहागर विधानसभा क्षेत्रातील नमन कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने ‘सुवर्ण भास्कर नमन स्पर्धा 2025’ चे आयोजन करण्यात आले होते. त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं, या उदात्त हेतूने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांची खास उपस्थिती होती. या कार्यक्रमातील हा व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)