बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी नुकतेच आई-बाबा झाले आहेत. कियारा अडवाणीने मुलीला जन्म दिला आहे. सध्या या दोन्ही जोडप्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कियारा-सिद्धार्थ लग्न
लग्नानंतर अडीच वर्षांनी दोघेही पालक झाले आहेत. दोघांचे लग्न 7 फेब्रुवारी 2023 रोजी झाले. 2021 मध्ये ‘शेरशाह’ नावाचा चित्रपट एकत्र प्रदर्शित झाला. असे म्हटले जाते की दोघांची प्रेमकहाणी या चित्रपटाच्या सेटवरून सुरू झाली होती. सिद्धार्थ आणि कियाराची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. कियारा आणि सिद्धार्थ यांनी फेब्रुवारी महिन्यात प्रेग्नंसीची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. एक इमोशनल पोस्ट देखील शेअर केली होती. ‘आमच्या आयुष्यातील सगळ्यात महाग गिफ्ट लवकरच येत आहे’, असं म्हणत कियारा आणि सिद्धार्थने ते आई बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. कियारा आणि सिद्धार्थ आई-बाबा झाल्याचं समजताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सेलिब्रिटी पापाराझीच्या अकाऊंटवरून पोस्ट शेअर
सोशल मीडियावर सेलिब्रिटी पापाराझी अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आई-बाबा झाल्याचं म्हटलं आहे. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा दोघे मंगळवारी आई-बाबा झाले आहेत. एका पापाराझी अकाऊंटने (व्हायरल भयानी) एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी कियाराने मुलीला जन्म दिल्याची माहिती दिली आहे. मात्र, कियारा आणि सिद्धार्थने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
View this post on Instagram
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











