सोनू सूदने पकडला साप; नेटकरी म्हणाले…

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो सोसायटीमध्ये आलेला साप पकडताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो त्याच्या सोसायटीत साप पकडताना दिसत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यासोबतच चाहते त्याच्या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ 

सोनू सूदने 19 जुलै रोजी त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये तो म्हणत आहे की, ‘हा आमच्या सोसायटीत आलेला. हा रॅट स्नेक आहे. तो विषारी नाही. पण तरीही असा साप पकडण्याचा प्रयत्न तुम्ही स्वतः करू नका. पण आपण काळजी घेणे, अतिशय महत्त्वाचे आहे.  तो पुढे म्हणाला की, मी यासाठी विशेष प्रशिक्षण घेतले आहे आणि हे काम अनुभवाशिवाय कोणी करू नये. व्हिडिओमधील साप त्याच्या सोसायटीत आढळला होता आणि सोनू सूदने त्याला एक बॅगमध्ये पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्याचा निर्णय घेतला. सोनू सूदने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, हर हर महादेव!

चाहत्यांकडून सोनू सूदच्या धाडसाचं कौतुक

सोनू सूदचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “रियल हिरो, हर हर महादेव, भगवान तुम्हाला सुखरूप ठेवो.” सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याच्या या कृतीचं भरभरून कौतुक केलं आहे. ‘सोनू आता माणसांनंतर प्राण्यांनाही घरी सोडत आहे’ अशा मजेशीर आणि कौतुकास्पद प्रतिक्रिया आहेत.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News