बॉलिवूड स्टार्सना शाही विवाह करण्याची आवड वाढली आहे, विशेषतः गेल्या 10-12 वर्षांत. पूर्वीच्या तुलनेत आता ते अधिक मोठे आणि थाटामाटाचे लग्न करताना दिसतात. बॉलिवूड स्टार्स आता त्यांच्या लग्नासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करताना दिसतात, ज्यात आलिशान स्थळे, डिझायनर कपडे, आणि मोठे सेलिब्रेशन यांचा समावेश असतो. शाही विवाहसोहळे हे त्यांच्या प्रसिद्धीचा आणि जीवनशैलीचा भाग बनले आहेत, ज्यामुळे ते चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. अनेक बॉलिवूड जोडप्यांनी भव्य आणि शाही विवाहसोहळे केले आहेत, ज्यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली आहे. रणवीर सिंग-दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा-विराट कोहली, प्रियांका चोप्रा-निक जोनास, विकी कौशल-कतरिना कैफ, आलिया भट्ट-रणबीर कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी ही स्टार जोडपी आहेत ज्यांनी त्यांचे लग्न खूप पैसे खर्च करून संस्मरणीय बनवले. या जोडप्यांमध्ये एक जोडपं असं आहे ज्यांच्या लग्नात फक्त 37 लोकांची हजेरी होती पण खर्च मात्र 77 कोटी. वाचूनच तुम्हाला शॉक बसला असेल पण हे कपल नेमकं आहे तरी कोण? याविषयी जाणून घेऊया….
लग्नात फक्त 37 लोकांची हजेरी होती
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टार कपल आहे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. 2018 मध्ये या जोडप्याने इटलीच्या लेक कोमो येथे अतिशय शाही आणि खाजगी पद्धतीने लग्न केले. या लग्नाची चर्चा आजही होते कारण त्यावर तब्बल 77 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला होता आणि विशेष म्हणजे लग्नाला केवळ 37 जवळचे पाहुणे उपस्थित होते. दीपिका आणि रणवीरचे लग्न दोन दिवसीय भव्य समारंभात झाले. कोंकणी पद्धतीने 14 नोव्हेंबरला आणि सिंधी पद्धतीने 15 नोव्हेंबरला विवाह सोहळा पार पडला. रणवीरने त्याच्या बारातींसह समुद्री विमानातून शानदार एंट्री केली होती.

प्रेमकहाणी कधी आणि कुठून सुरू झाली?
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)