बिग बॉस फेम छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे याने पहिल्यांदाच त्याच्या आजारपणाविषयी भाष्य केलंय. लहानपणापासून तो आरोग्याशी संबंधित गंभीर त्रास सहन करतोय. आपली मतं ठामपणे मांडणारा छोटा पुढारी खऱ्या आयुष्यात मात्र अनेक शारीरिक समस्यांना तोंड देतोय.
घनश्याम दरोडे
बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून प्रेक्षकांच्या लक्षात आलेला घनःश्याम दरोडे, ज्याला चाहत्यांनी प्रेमाने ‘छोटा पुराढी’ हे टोपणनाव दिलं आहे, पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. घरातल्या त्याच्या दमदार खेळीमुळे तो लोकप्रिय झाला, मात्र वैयक्तिक आयुष्यात घनःश्यामने अनेक आव्हानांचा सामना केला आहे.

लिव्हर आणि किडनीचे आजार होते
घनश्यामने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, आपल्या आजारपणाविषयी त्याने पहिल्यांदाच भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये घनश्याम म्हणाला, “माझं बालपण हॉस्पिटलमध्येच गेलं. सहा वर्षांचा होईपर्यंत मी रुग्णालयात होतो. जन्मतःच मला काही गंभीर समस्या होत्या. आजही लिव्हर आणि किडनीसंबंधीचा त्रास आहे. मला थायरॉईडचा त्रास होता. माझ्या लिव्हर आणि फुप्फुसांना सूज आहे. मी आजही इंजेक्शन घेतो. कारण, माझं रक्त आपोआप तयार होत नाही. रक्त शुद्ध करण्यासाठी मला इंजेक्शन घ्यावं लागतं. त्यात मला क्रिएटीन आहे, त्यामुळे माझ्या किडनीलाही त्रास आहे.” याबद्दल सांगताना घनश्याम भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. उंची कमी असल्यामुळे मला गावात अनेकदा हेटाळणीला सामोरं जावं लागलं, पण त्या सगळ्यावर मात करून मी आज इथपर्यंत पोहोचलो,” असं घनःश्यामने सांगितलं. उंचीवरून अनेकदा त्याला ट्रोल देखील केलं. या काळात त्याने खूप त्रास सहन केला असून, हे सांगताना तो भावूक झाला.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)