पॉडकास्टमध्ये जया बच्चन लेक श्वेतावर भडकल्या, म्हणाल्या….

Asavari Khedekar Burumbadkar

बॉलिवूडमधल्या काही प्रतिष्ठित कुटुंबियांपैकी एक म्हणजे, बच्चन कुटुंबीय. कोणत्या ना कोणत्या कारणानं हे कुटुंब नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच अभिनेत्री जया बच्चन त्यांची लेक श्वेता नंदा आणि नात नव्या नवेली नंदा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जया त्यांच्या लेकीवर म्हणजेच, श्वेता नंदावर चिडल्याचं दिसतंय. तसेच, ते श्वेता नंदाची वाईट सवयही जाहीरपणे सांगत असल्याचं पाहायला मिळतंय…

जया बच्चन लेक श्वेता बच्चनवर चिडलेल्या दिसल्या….

नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्ट ‘व्हॉट द हेल नव्या’च्या एका एपिसोडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पॉडकास्टमध्ये नव्याने तिच्या आई आणि आजीला एक प्रश्न विचारला की, “इंटरनेटचा मानव म्हणून आपल्यावर काय परिणाम झाला आहे? तुम्हाला वाटते का की आपण पूर्वीपेक्षा दयाळू झालो आहोत? तुम्हाला वाटते का की आपण आशावादी झालो आहोत?” जया बच्चन उत्तर देण्यापूर्वीच श्वेता म्हणाली, “जे लोक नैसर्गिकरित्या दयाळूपणा असतो ते अधिक दयाळू असतात. जे लोक नैसर्गिकरित्या कडू असतात ते कडू असतात आणि वाईट लोक वाईट असतात. हा सामान्यतः मानवी स्वभाव आहे.” श्वेताचे हे वाक्य ऐकून जया बच्चन चिडल्या आणि त्यांनी श्वेताला फटकारलं. त्या म्हणाल्या “श्वेता, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. तूच एकमेव आहेस जी सतत मत देत असते आणि सतत मध्ये मध्ये बोलत असते.”

फक्त मी, मी आणि मी ….

त्यावर जेव्हा श्वेता बच्चन म्हणाली की हा पॉडकास्ट देखील मते देण्यासाठी आहे, तेव्हा जया म्हणाल्या, “हो, ही चांगली गोष्ट आहे, पण ती फक्त मी, मी आणि मी नाही. कधीकधी तुम्हाला फक्त बसून समोरच्याच ऐकावंही लागतं.” आईला चिडलेलं पाहून श्वेता नंतर गप्प झालेली दिसली. जया आणि श्वेता यांचा हा संवाद सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेक लोकांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या