मराठी सिनेसृष्टीमधील सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरला सुरुवात केली आणि आज तिने कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर तर ती फारच सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील प्राजक्ताचे फोटो पाहून नेटकरीही थक्क होतात. आता देखील प्राजक्ताने गुलाबी रंगाच्या साडीमध्ये खास फोटोशूट केलं आहे…
अभिनेत्री प्राजक्ता माळी
‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सर्वांचे लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. आपल्या अभिनयाने चर्चेत असणारी प्राजक्ता सोशल मीडियाद्वारे ही तितकीच चर्चेत राहत असते. सोशल मीडियावर प्राजक्ता माळी तिचे विविध लूक्समधील फोटो शेअर करत असते. प्राजक्ताने गुलाबी रंगाच्या साडीमधील मनमोहक फोटो शेअर केले आहेत. तिचा हा लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

प्राजक्ता माळीचा शकुंतला लूक
प्राजक्ता माळी आपले कायमच वेगवेगळे फोटो शेअर करत असते. प्राजक्ताने यावेळी शकुंतलाचा लूक केला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीचा शकुंतला लूक पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर या लूकची जोरदार चर्चा रंगली आहे. प्राजक्ताचं हे नवं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या या नव्या लूकला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)