पंचायत’ या लोकप्रिय सीरिजच्या चौथ्या सीझनची सध्या ओटीटी विश्वात चांगलीच चर्चा सुरू आहे. अशातच आता या सीरिजमधील एका अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत एक माहिती समोर आली आहे. खरंतर, अभिनेत्याने स्वतःच त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली आहे.
आसिफ खानला हृदयविकाराचा झटका
पंचायत फेम अभिनेता आसिफ खानला हृदयविकाराचा झटका आला आहे. सोशल मीडियावर आसिफ खानने पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे. त्याने लिहिले, ‘गेल्या ३६ तासांपासून हे पाहिल्यानंतर मला कळले आहे. आयुष्य लहान आहे, एकाही दिवसाला हलके घेऊ नका, एका क्षणात सगळं बदलू शकते, तुमच्याकडे असलेल्या आणि तुम्ही कोण आहात याबद्दल कृतज्ञ रहा. तुमच्यासाठी कोण जास्त महत्वाचे आहे हे लक्षात ठेवा आणि नेहमी त्यांची कदर करा. आयुष्य ही एक देणगी आहे आणि आपण धन्य आहोत.’

आसिफ खानची प्रकृती आता कशी आहे?
‘पाताळ लोक’ आणि ‘पंचायत’ या सीरिजमधून प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता आसिफ खानला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आसिफने म्हटलं आहे ‘गेल्या काही तासांत माझी प्रकृती ठीक नव्हती आणि मला रुग्णालयात दाखल करावे लागले. आता मला हे सांगण्यास आनंद होत आहे की मी बरा होत आहे आणि पूर्वीपेक्षा खूप बरे वाटत आहे. तुमच्या प्रेम, काळजी आणि शुभेच्छांसाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी लवकरच परत येईन. तोपर्यंत तुमच्या प्रार्थना आणि आठवणींमध्ये मला ठेवल्याबद्दल धन्यवाद.’