गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात हिंदी-मराठी वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शाळांमध्ये पहिलीपासूनच हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला. या निर्णयावर राजकीय तसंच मनोरंजन क्षेत्रातील अनेकांकडून विरोध झाला. त्यानंतर सरकारकडून हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द करण्यात आले. यानंतरही मराठी-हिंदी भाषेवरून विविध प्रतिक्रिया समोर आल्या. या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावर रितेश देशमुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये तो एका व्यक्तीला मराठीत बोलण्यास सांगताना दिसतो. याच व्हिडीओवर रील्स स्टार पुनीत सुपरस्टारने रितेश देशमुखवर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे.
रितेश देशमुखवर बिग बॉस फेम रिलस्टार पुनीत सुपरस्टारची टीका
अभिनेता रितेश देशमुखवर बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झालेला रिलस्टार पुनीतने निशाणा साधला आहे.

Published on -











