गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात हिंदी-मराठी वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शाळांमध्ये पहिलीपासूनच हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला. या निर्णयावर राजकीय तसंच मनोरंजन क्षेत्रातील अनेकांकडून विरोध झाला. त्यानंतर सरकारकडून हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द करण्यात आले. यानंतरही मराठी-हिंदी भाषेवरून विविध प्रतिक्रिया समोर आल्या. आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री रेणुका शहाणे यांचे पती आशुतोष राणा यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांना भाषेच्या वादावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “भाषा ही नेहमीच संवादाचा विषय असते, वादाचा नाही.”
काय म्हणाले आशुतोष राणा?
अभिनेते आशुतोष राणा यांनी मराठी-हिंदी भाषेच्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, “भाषा ही संवादाचे माध्यम आहे, वादाचे नाही.” तसेच, त्यांनी त्यांची पत्नी रेणुका शहाणे आणि मुलांची मातृभाषा मराठी असल्याचे सांगितले. आशुतोष राणा यांनी ‘हीर एक्सप्रेस’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी मराठी-हिंदी भाषेच्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले की, “भाषा कधीही वादाचा विषय नसावी. भारत संवादामध्ये विश्वास ठेवतो, वादात नाही.” त्यांचे हे विधान भाषेच्या मुद्द्यावर समजूतदारपणा दर्शवते.

हिंदी-मराठी भाषा वाद
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











