सैराट’ फेम रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि यावेळी कारण आहे तिचं इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन. या सेशनमध्ये रिंकूने चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा करत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. तिच्या उत्तरांमुळे चाहते खुश झाले असून, सोशल मीडियावर तिच्या रिप्लायचे स्क्रीनशॉट्स मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत.
रिंकू राजगुरू
रिंकू सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे. ती फोटो-रील्समुळे इन्स्टाग्रामवर चर्चेत असते. नुकतेच तिने या प्लॅटफॉर्मवर ‘आस्क मी एनीथिंग’ या सेशनमधून चाहत्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. कोणी तिला सिनेमाविषयी विचारलं, तर कोणी तिला वैयक्तिक आयुष्याविषयीही विचारलं. प्रेमाविषयी विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांचीही रिंकूने स्पष्ट उत्तरं दिली.

इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन
या सेशनदरम्यान एका चाहत्याने विचारलं, ‘रिंकू, तुझा डेटिंगचा विषय सोशल मीडियावर चालू आहे, ते खरं का?’ यावर रिंकूने कोणताही वेळ न घालवता उत्तर दिलं आणि तिच्या डेटचा फोटो शेअर केला. त्या फोटोवर तिने लिहिलं – ‘सोलो डेट.’ म्हणजेच रिंकू स्वतःसाठी वेळ काढून एकटीच डेटवर गेली होती, हे पाहून चाहते खुश झाले आणि तिच्या या स्वॅगला भरभरून प्रतिसाद दिला. त्याच सेशनमध्ये आणखी एका नेटकऱ्याने विचारलं, ‘तुला प्रेमावर विश्वास आहे का?’ यावर रिंकूने थोडक्यात पण मनाला भिडणारं उत्तर दिलं – ‘होय.’ दुसऱ्या चाहत्याने विचारलं, ‘तू सिंगल आहेस का?’ त्यावरही तिने प्रामाणिकपणे ‘होय’ असं लिहिलं. तिच्या या थेट स्वभावामुळे चाहते म्हणाले, ‘रिंकू तू खूप रिअल आहेस.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)