करीना कपूर खान ही बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते. लल्लंटॉपला दिलेल्या मुलाखतीत, करिनाच्या न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी करीनाच्या डाएटबद्दल शेअर केले आहे. ऋजुता यांनी सांगितले की, करीना गेल्या 18 वर्षांपासून म्हणजेच 2009 पासून हा डाएट फॉलो करत आहे. करीना कपूर खान प्रमाणे तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही अभिनेत्रीचा डाएट प्लॅनदेखील फॉलो करू शकता. करिनाच्या न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी करीना सकाळी, दुपारी आणि रात्री काय खाते हे सांगितले आहे, जाणून घ्या करिनाचा संपूर्ण डाएट प्लान…
करीना कपूर खानचा डाएट
सकाळी नाश्त्यापूर्वी – बदाम, अंजीर आणि मनुका सारखा सुकामेवा

नाश्ता – पराठा किंवा पोहे
दुपारचे जेवण – डाळ आणि भात किंवा चीज टोस्ट
संध्याकाळचा नाश्ता – आंबा किंवा आंब्याचा मिल्कशेक (हंगामी शेक)
रात्रीचे जेवण – खिचडी किंवा पुलाव तूपासह
ऋजुता दिवेकर म्हणाल्या की….
ऋजुता दिवेकरने सांगितले की करीनाला सेटवर डाळ-भात खायला आवडते आणि ती सहसा दुपारच्या जेवणात चपाती आणि भाजी खाते. ऋजुता यांनी असेही सांगितले की करीना आठवड्यातून चार वेळा खिचडी आणि तूप खाते आणि तिला दालखिचडी प्रचंड आवडते. तिच्या डाएटचा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि काही महिन्यांपूर्वी हीच गोष्टी खुद्द करिनानेदेखील सांगितली होती. करीनाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचा स्वयंपाकी तिच्यावर नाराज आहे कारण करीनाला १० ते १५ दिवस सतत एकाच प्रकारचे अन्न शिजवले जाते. तोच डाळ भात किंवा दही भात. करीना म्हणाली होती, “मी आठवड्यातून ५ दिवस खिचडी खाल्ल्यानंतरही आनंदी राहू शकते. एक चमचा तूप घालून खाल्ल्यानंतर मला सर्वाधिक आनंद होतो.”
करीना योगा ही करते
करीना स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा करते. योगा हा करीनाच्या आयुष्याचा एक भाग आहे. तिला वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करायला आवडते. करीना गेल्या १० वर्षांपासून योगा करत आहे. योगाव्यतिरिक्त, करीना पिलेट्स, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम देखील करते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)