अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने वेगवेगळ्या मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. आता ती अभिनेत्रीसोबतच निर्माती क्षेत्रातही नाव कमावत आहे. शर्मिष्ठाने नुकत्याच ‘लोकशाही’ला दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटावर भाष्य केलं आहे. तिचे पहिले लग्न अयशस्वी ठरले होते. त्याबद्दल तिने नुकतेच एका मुलाखतीत शेअर केले. याबद्दल अभिनेत्री काय म्हणालीये जाणून घेऊयात…
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत काय म्हणाली…
शर्मिष्ठाचं पहिलं लग्न अमेय निपाणकरशी झालं होतं. शर्मिष्ठा आणि अमेय यांनी २०१८ मध्ये घटस्फोट घेतला. शर्मिष्ठा सांगते, “त्या काळात आपलं आयुष्य आपल्याला बरंच काही शिकवून जातं. मी ‘बिग बॉस’मध्ये जेव्हा गेले होते तेव्हा सुद्धा मी हेच बोलले होते की, मी लग्नाचा निर्णय घेतला होता…तो माझा निर्णय होता आणि तो चुकला. मी यासाठी कोणालाही दोष देणार नाही, आरोपही करणार नाही. जेव्हा न पटण्याची किंवा मतभेदाची सुरुवात होते तेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला चुकीचीच दिसत असते. या जगात प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो त्यामुळे मी इतकंच म्हणेन निर्णय माझा चुकला. माझे काही निर्णय चुकले तसे समोरच्या व्यक्तीचेही चुकले. दोन चांगली माणसं एकत्र आली म्हणजे सगळं चांगलंच होईल असं नसतं.

माझ्या त्या कठीण काळात माझं कुटुंब कायम माझ्याबरोबर होतं. आज ऑन कॅमेरा सुद्धा मी सर्वांना विनंती करते, वैष्णवी हगवणेसारखी प्रकरणं समोर येतात… अशा बऱ्याच मुलींना घरी परत यायचं असतं. प्लीज त्यांना येऊद्या परत… माझ्या आई-वडिलांनी त्याकाळात मला खूप साथ दिली. त्यावेळी माझ्या पालकांचं एकच म्हणणं होतं, राणी तू काहीच काळजी करू नकोस… तुझा निर्णय झालाय ना? आम्ही तुझ्या पाठिशी आहोत. आम्हाला कोणी विचारलं तर आम्ही सांगू,आलीये आमची मुलगी परत… माझ्या बाबांनी तर मला खूपच साथ दिली.”
मी माझ्या आयुष्याला दुसरी संधी द्यावी
“मी ‘बिग बॉस’च्या घरात होते तेव्हा एक निर्णय घेतला. त्यावेळी रेशम ताई, मेघा, आऊ, सई या सगळ्यांनी सांगून-सांगून, माझं ब्रेन वॉश करून मला तो निर्णय घ्यायला लावला होता. तो निर्णय म्हणजे, की मी माझ्या आयुष्याला दुसरी संधी द्यावी.” तिच्या जवळच्या लोकांनी, जसे की रेशम ताई, मेघा, आऊ आणि सई, तिला तिच्या आयुष्याला दुसरी संधी देण्याचा निर्णय घेण्यास मदत केली. तिने सांगितले की, तिला भावनिक स्थिरता हवी होती आणि ती तिला तेजस देसाई यांच्यासोबत मिळाली. सगळ्यांचं मत ऐकून शर्मिष्ठाने तेजस देसाईशी दुसरं लग्न केलं. आता दोघेही सुखाचा संसार करत आहेत. शर्मिष्ठासाठी तेजस डोंबिवलीला राहायला गेला. याशिवाय आता दोघांनी प्रॉडक्शन हाऊससुद्धा सुरू केलं आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)