उर्फी जावेदचे ओठ सुजले, ओळखणेही कठीण; लिप फिलर काढतानाचा व्हिडीओ केला शेअर

Asavari Khedekar Burumbadkar

आपल्या बोल्ड फॅशनसाठी ओळखली जाणारी उर्फी जावेद अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतेच. उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो खूपच वेदनादायक आहे, यामध्ये ती ९ वर्षांनी तिचे लिप फिलर काढताना दिसत आहे.

उर्फीने लिप फिलर्सचा व्हिडिओ शेअर केला

उर्फी जावेदने लिप फिलर ट्रीटमेंट घेतली होती आणि तिने ते काढण्याचा निर्णय घेतला. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने तिच्या ओठांतील फिलर्स काढण्याची प्रक्रिया दाखवली आहे. उर्फीने सांगितले की तिने 9 वर्षांपूर्वी लिप फिलर्स घेतले होते आणि आता ती ती काढून टाकत आहे कारण तिला ते योग्य वाटत नव्हते. या ट्रीटमेंट दरम्यानचा व्हिडिओ उर्फीने पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी आपल्या ओठांवर काही इंजेक्शन घेताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने तिच्या ओठांवर आणि चेहऱ्यावर आलेली सूज दाखवली आहे, ज्यामध्ये तिने फिलर्स काढल्यामुळे वेदना होत असल्याचे सांगितले आहे. या ट्रीटमेंटमुळे उर्फीला ओळखताही येत नाहीये. तिच्या या बदललेल्या लुकमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 

18 व्या वर्षी केली होती ट्रीटमेंट

उर्फी जावेदने सांगितले की तिने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी लिप फिलर ट्रीटमेंट घेतली होती. आता जवळपास 9 वर्षांनी ती हे लिप फिलर्स हटवत आहे. सध्या उर्फीचा लिप फिलर्स हटवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, अनेकजण तिच्या प्रामाणिकपणाचे आणि धाडसाचे कौतुक करत आहेत. उर्फीने तिच्या चाहत्यांना सांगितले की, तिने हे फिलर्स काढले कारण ते तिच्यासाठी योग्य नव्हते आणि तिला नैसर्गिकरित्या अधिक चांगले दिसायचे आहे. तिच्या या धाडसी निर्णयाचे आणि प्रामाणिकपणाचे चाहते कौतुक करत आहेत. उर्फीने तिच्या चाहत्यांना सांगितले की, ती फिलर्सला पूर्णपणे नाही म्हणत नाही, परंतु तिला योग्य डॉक्टरांकडून आणि योग्य पद्धतीने ट्रीटमेंट घ्यायची आहे. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या