Govardhan Asrani Death: सुप्रसिद्ध अभिनेते गोवर्धन असरानी यांचे निधन; हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा!

ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालं असून संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. असरानी यांचे आज दुपारी 4.00 वाजताच्या दरम्यान निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.

फुफ्फुसांच्या आजारामुळे गेल्या पाच दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांना आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अभिनेत्याचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी असरानी यांच्या मृत्यूची बातमी सांगितली. आज दुपारी साधारण 4.00 वाजता असरानी यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. ५० वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या काही कलाकारांपैकी असरानी एक होते.

गोवर्धन असरानी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालं असून संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. असरानी यांचं पूर्ण नाव गोवर्धन असरानी असून ते अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. फुफ्फुसांच्या आजारामुळे गेल्या पाच दिवसांपासून असरानी यांना आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. असरानी अनेक दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. संध्याकाळी सांताक्रूझमधील शास्त्री नगर येथे त्यांच्या जवळचे लोक आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

असरानींची उल्लेखनीय कारकीर्द

कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे झाला. त्यांनी जयपूरमधील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर राजस्थान कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. १९६७ मध्ये ‘हरे कांच की चुडियाँ’ या चित्रपटाद्वारे असरानी यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. असरानींच्या सर्वात संस्मरणीय भूमिकांपैकी, ‘शोले’ चित्रपटातील जेलरची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या चित्रपटातील त्यांचा डायलॉग, ‘हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं’ खूप प्रसिद्ध झाला आणि दशकांनंतरही लोक अजूनही या डायलॉगसाठी असरानींना ओळखतात.

गोवर्धन असरानींच्या निधनामुळे एका सच्चा कलाकार, अभिनेता गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. हिंदी सिनेसृष्टीवर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. 80 / 90 च्या काळात असरानींना सिनेसृष्टीला दिलेले योगदान अनमोल अशा स्वरूपाचे आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News