हार्दिक पांड्याच्या नव्या गर्लफ्रेंडचं नाव काय? वय फक्त 24; करते प्रचंड कमाई

Jitendra bhatavdekar

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ज्या दिवसापासून त्याची एक्स वाइफ नताशा सोबत वेगळा झाला आहे, त्या दिवसापासूनच चाहत्यांनी त्याच्या गर्लफ्रेंडबाबत तर्कवितर्क लावायला सुरुवात केली आहे. हार्दिक जेव्हा जेव्हा एखाद्या मुलीसोबत दिसतो, तेव्हा त्याच्या प्रेमसंबंधांबाबत चर्चा सुरू होतात. अलीकडेच हार्दिक पांड्या एका नव्या मुलीसोबत दिसला आहे. तो एका मुलीसोबत एअरपोर्टवर दिसल्यावर सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली. चाहते या मुलीला हार्दिकची नवी गर्लफ्रेंड म्हणत आहेत.

सांगितलं जातंय की व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्याच्या सोबत जी मुलगी दिसते आहे, तिचं नाव माहिका शर्मा आहे. माहिका ही एक अभिनेत्री आणि फिटनेस मॉडेल आहे. चाहते माहिका बद्दल मोठ्या प्रमाणावर सर्च करत आहेत. येथे आम्ही तुम्हाला माहिका विषयी संपूर्ण माहिती देणार आहोत. पहिल्यांदाच हार्दिक पांड्या माहिका शर्मा सोबत दिसला आहे.

माहिका शर्मा बद्दल सर्व काही जाणून घ्या

माहिका शर्मा हिचा जन्म दिल्लीमध्ये झाला आहे. तिचं वय फक्त २४ वर्षे आहे. माहिका ही एक अभिनेत्री, मॉडेल आणि फिटनेस कंटेंट क्रिएटर आहे. ती सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. माहिकाने दिल्लीमध्येच शिक्षण घेतलं असून, तिने इकॉनॉमिक्स आणि फायनान्समध्ये पदवी (ग्रॅज्युएशन) पूर्ण केली आहे. आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे आणि आत्मविश्वासामुळे माहिका एंटरटेनमेंट जगतात स्वतःची खास ओळख निर्माण करत आहे.

ताज्या बातम्या