‘हाउसफुल ५’चा पहिला रिव्यू आला, कशी आहे अक्षय कुमार-रितेश देशमुखची कॉमेडी? जाणून घ्या

Jitendra bhatavdekar

Housefull 5 Review :  अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते आहे. हा चित्रपट ६ जूनला प्रदर्शित होणार असून, त्याचा ट्रेलर, स्टारकास्ट आणि गाणी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये याबाबत मोठी उत्सुकता आहे.

चित्रपट ६ जूनला रिलीज होणार आहे आणि त्यानंतर समीक्षक आपले अभिप्राय देतील. मात्र, उमैर संधू यांनी हा चित्रपट परदेशात पाहून पहिला रिव्ह्यू दिला आहे. जाणून घेऊया त्यांनी चित्रपटाबद्दल काय म्हटले आहे.

हाऊसफुल ५कसा आहे?

उमर संधू यांनी ‘हाऊसफुल ५’ चा दोन ओळींचा रिव्ह्यू लिहिला आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘हाऊसफुल ५’ चा पहिला रिव्ह्यू! जे काही चमकते ते सोने नसते! सर्व कलाकारांच्या क्रींज अभिनयासह अतिशय वाईट कॉमडी!’

संधू येथेच थांबले नाहीत. अक्षय कुमारवर निशाणा साधत त्यांनी पुढे लिहिले की, ‘भारतात बनवलेल्या सर्वात वाईट कॉमेडी चित्रपटांपैकी एक! डोकेदुखी आणि जबरदस्तीने केलेली कॉमेडी! तुमचे पैसे वाचवा आणि चित्रपट टाळा.’

संधूने आपल्या पहिल्या रिव्ह्यूमध्ये ‘हाऊसफुल ५’ ला ५ पैकी फक्त १ स्टार दिला आहे. तरीही, हा संधूचा वैयक्तिक अभिप्राय असू शकतो. चित्रपट कसा आहे आणि प्रेक्षकांना किती आवडतो, याचा अंदाज ६ जूनच्या ओपनिंग दिवशीच होणार आहे.

हाऊसफुल ५ची जोरदार अ‍ॅडव्हान्स बुकिंग

सैक्निल्कच्या माहितीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशीच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत सुमारे १२ हजार तिकीटे विकून आणि ब्लॉक सीट्ससह जवळपास २.८८ कोटी रुपयांची अ‍ॅडव्हान्स बुकिंग केली आहे.

चित्रपट रिलीज होण्यासाठी अजून ५ दिवस शिल्लक आहेत आणि तो पहिल्या दिवशी याहूनही जास्त कमाई करू शकतो. पिंकविला च्या रिपोर्टनुसार, बॉक्स ऑफिसवर अक्षयच्या या चित्रपटाने २७.५० कोटी रुपयांचा ओपनिंग कलेक्शन करण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या