Jolly LLB 3 Box Office Collection : फ्लॉप किंग’ ते ‘हिट मशीन’; जॉली LLB 3 ची कमाईच्या बाबतीत जोरदार मुसंडी

प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर, दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे

१९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट ‘जॉली एलएलबी 3’ बॉक्स ऑफिसवर Jolly (LLB 3 Box Office Collection) हळूहळू यशाची वाट चालत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर, दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून सलग अपयश पाहत आलेल्या अक्षय कुमारसाठी हा सिनेमा पुन्हा एकदा यशाचा दरवाजा उघडतो की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे.

दुसऱ्या दिवशी किती कोटींचा गल्ला?

सुभाष कपूर दिग्दर्शित या कोर्टरूम ड्रामाने पहिल्या दिवशी 12.75 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी, दुपारी ५:०५ पर्यंतच चित्रपटाने 7.43 कोटी रुपयांचा गल्ला जमवत एकूण 20.18 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हे आकडे सकाळीपर्यंतचे असून, संध्याकाळ व रात्रीच्या शोमुळे अंतिम कलेक्शन यापेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

या चित्रपटाने अक्षय कुमारच्या यंदाच्या इतर चित्रपटांनाही मागे टाकले आहे. 2025 मध्ये ‘स्काई फोर्स’ ने 12.25 कोटी, ‘केसरी चॅप्टर 2’ ने 7.75 कोटी आणि ‘हाऊसफुल 5’ ने 24 कोटींची ओपनिंग केली होती. ‘जॉली एलएलबी 3’ ही वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम ओपनिंग घेणारी अक्षयची फिल्म ठरली आहे. तसेच ‘सितारे जमीन पर’, ‘बागी 4’ यांसारख्या फिल्म्सच्या पुढे जात 2025 मधील टॉप १० ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांमध्ये तिने ७वा क्रमांक पटकावला आहे. (Jolly LLB 3 Box Office Collection)

चित्रपटाचे बजेट किती?

चित्रपटाचे बजेट सुमारे ८० कोटी रुपये असून, पहिल्या दोन दिवसांतच याच्या एकूण खर्चाच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम वसूल झाली आहे (Jolly LLB 3 Box Office Collection) . चित्रपटात अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या जोडीसोबत हुमा कुरेशी, अमृता राव आणि सौरभ शुक्ला महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. विशेष म्हणजे सौरभ शुक्ला पुन्हा एकदा या फ्रँचायझीतील ‘जज’च्या भूमिकेत झळकले आहेत.

चित्रपटाला समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कथा, संवाद, विनोद आणि कोर्टरूम ड्रामाचा संतुलित मेळ असल्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होत असल्याचे चित्र आहे. सोशल मीडियावरही प्रेक्षकांनी अक्षयच्या परतलेल्या जुन्या ‘फॉर्म’चं कौतुक केलं आहे. अक्षय कुमारसाठी ही संधी खूप महत्त्वाची आहे. अनेक अपयशांनंतर ‘फ्लॉप किंग’ असा शिक्का बसलेल्या अक्षयसाठी ‘जॉली एलएलबी 3’ ही एक सकारात्मक वळण असू शकते. आता हा सिनेमा यशाच्या दिशेने किती दूर जातो आणि किती कमाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला हा सिनेमा पुढील आठवड्यांत किती स्थिर राहतो आणि तिकीट खिडकीवर किती गल्ला जमा करतो, यावर त्याचे अंतिम यश अवलंबून असेल. सध्यातरी चित्रपट ‘हिट’ होण्याच्या मार्गावर आहे, आणि अक्षयसाठी ही एक नवी सुरुवात ठरू शकते.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News