Jolly LLB 3 ठरतोय बॉक्स ऑफिसचा बादशाह; यशामागे आहेत ‘ही ‘5 मोठी कारणं

Asavari Khedekar Burumbadkar

१९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांचा ‘Jolly LLB 3’ सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. ‘निशानची’ आणि ‘अजेय’ सारख्या चित्रपटांशी स्पर्धा असूनही, या कोर्टरूम ड्रामाने आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. ओपनिंग वीकेंडमध्ये ५० कोटींपेक्षा अधिक कमाई करत, हा चित्रपट हिट ठरत आहे. आज आपण पाहूया अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट ‘मस्ट वॉच’ ठरतोय!

1) खऱ्या घटनेवर आधारित कथानक

चित्रपटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे याची कथा. ‘जॉली एलएलबी ३’ २०११ साली उत्तर प्रदेशमधील भट्टा पारसौल गावात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. या घटनेला सिनेमॅटिक टच देत कथेला काल्पनिक रूप दिलं गेलं आहे. सत्य घटनांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांमध्ये वेगळीच उत्सुकता निर्माण करतात, आणि हेच या चित्रपटाच्या यशाचं पहिलं कारण ठरतंय.

2) सुपरहिट फ्रँचायझीचा प्रभाव

२०१३ मध्ये आलेल्या पहिल्या भागात अरशद वारसी यांनी भूमिका केली होती, तर २०१७ मध्ये आलेल्या दुसऱ्या भागात अक्षय कुमार झळकले होते. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. आता या तिसऱ्या भागात हे दोघेही एकत्र आले आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

3)दमदार संवाद – चित्रपटाची यूएसपी

चित्रपटातले काही संवाद तर आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
उदाहरणार्थ –
“अमीर, अमीर बनता जा रहा है, गरीब और भी गरीब!”
“हमें लक्ष्मीजी ने यहां भेजा, हम भी तो लक्ष्मी के लिए बैठे हैं!”
हे संवाद प्रेक्षकांच्या मनात थेट घर करून बसले आहेत.

4) सिस्टिमवर केलेली तीव्र टीका Jolly LLB 3

चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, समाजातील गंभीर मुद्देही समोर आणतो. प्रशासनाच्या मदतीने मोठे उद्योगपती कसे गरीब शेतकऱ्यांचे शोषण करतात, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. आजही शेतकऱ्यांची स्थिती बदललेली नाही, आणि चित्रपट त्याच वास्तवाचं भान प्रेक्षकांना करून देतो.

5) स्टारकास्टची दमदार अॅक्टिंग आणि कॉमेडीचा डबल डोस

अक्षय कुमार, अरशद वारसी, सौरभ शुक्ला, हुमा कुरेशी, अमृता राव, सीमा विश्वास आणि गजराज राव यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांनी त्यांच्या भूमिका जबरदस्त पद्धतीने वठवल्या आहेत. विशेषतः अक्षय-अरशद-सौरभ या त्रिकूटाची विनोदी केमिस्ट्री प्रेक्षकांना अक्षरशः हसवून हसवून पोट दुखवते आहे.

‘Jolly LLB 3’ हा चित्रपट केवळ मनोरंजन करत नाही, तर सामाजिक संदेशही देतो. सत्य घटनांवर आधारित कथा, हिट फ्रँचायझीचा आधार, तिखट संवाद, व्यवस्थेवर केलेली बोचरी टीका आणि उत्तम अभिनय – या साऱ्यांमुळे हा चित्रपट नक्कीच एक ‘मस्ट वॉच’ ठरतोय.

ताज्या बातम्या