Jyoti Chandekar passes away : मराठी चित्रपट क्षेत्रातील मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं पुण्यात निधन झालं. त्या ६८ वर्षांच्या होत्या. आज दुपारी ४ वाजेच्या सुमारात त्यांची प्राणज्योत मालवली. स्टार प्रवाह मालिकेतील ठरलं तर मग या मालिकेतील पूर्णा आजीच्या रुपात त्या घरोघरी पोहोचल्या होत्या. अचानक त्यांनी घेतलेल्या एक्झिटमुळे मराठी अभिनय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
ठरलं तर मग मालिकेच्या पूर्णा आजीचं निधन…
ज्योती चांदेकर यांनी सिंधुताई सपकाळ या चित्रपटात सिंधुताईंची भूमिका साकारली होती. तर त्यांची लेक तेजस्विनी पंडित हिने सिंधुताई सपकाळंची तरुणपणातील भूमिका साकारली होती. त्याशिवाय ठरलं तर मग स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिकेत त्यांनी पूर्णा आजीची भूमिका साकारली होती. पूर्णा आजीबद्दल चाहत्यांना आदर वाटत होता. मात्र अचानक पूर्णा आजीच्या निधनाने चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

नेमकं कारण अद्याप कळलेलं नाही…
ज्योती चांदेकर या सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय होत्या. ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर अनेकांसोबत ते रिल्स करायच्या. फोटो सेशन करायच्या आणि सोशल मीडियावर नियमित शेअर करीत होत्या. अगदी मेकअफ क्रूपासून मालिकेतील सर्व पात्रांसोबत त्यांची छान गट्टी जमली होती. सर्वांना त्यांच्याविषयी अपार आदर होता. आपल्याला वडिलाधाऱ्या अभिनेत्रीने अचानक घेतलेल्या एग्झिटमुळे कलाकारांना धक्का बसला आहे.