बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या केवळ तिच्या चित्रपटांमुळेच नव्हे तर वर्क कल्चरवर सुरु असलेल्या चर्चेमुळेही चर्चेत आहे. ‘स्पिरिट’ आणि ‘कल्कि 2898 एडी’ या चित्रपटांच्या सिक्वेलमधून बाहेर पडल्यानंतर, दीपिकाने आठ तासांच्या वर्क शिफ्टवर ठाम राहिल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये एक नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. या पार्श्वभूमीवर आता बॉलिवूड अभिनेत्री काजोलने आपल्या स्पष्ट वक्तव्याने चर्चेत खळबळ उडवून दिली आहे.
“प्रत्येक क्षण पूर्ण फोकस हवा असतो”
‘द हॉलीवुड रिपोर्टर इंडिया’ ला दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने सांगितले की, अभिनय हे काम ९ ते ५ ची नोकरी नसून, यात प्रत्येक क्षण १००% उपस्थित राहावं लागतं. ती म्हणाली, “शूटिंग सुरू असेल तर सलग ४५ दिवस पूर्ण कमिटमेंट आवश्यक असते. काही कलाकार कदाचित प्रत्येक वेळी तितकं देत नसतील, पण माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे.

काजोलने पुढे सांगितले, “जरी शूटिंग नसले, तरीही आम्ही सतत व्यस्त असतो. कधी प्रमोशन, कधी इव्हेंट्स, कधी फोटोशूट्स प्रत्येक वेळी १००% फोकस ठेवणं लागतो. १२ ते १४ तास सतत फोकस ठेवणं सोपं नाही. ती म्हणाली, “९ ते ५ नोकरीमध्ये मधे चहा-कॉफी ब्रेक मिळतात, पण कलाकारांना सतत नजरेत राहावं लागतं. ब्रेक घेतलास तरी लोक त्यावर बोलतात.”
दीपिकाच्या वादाशी जोडला जातोय काजोलचा हा विचार
काजोलच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर हे मत दीपिका पदुकोणच्या वर्किंग अवर्सविषयी झालेल्या वादाशी जोडले जात आहे. अनेकांनी काजोलच्या स्पष्ट मताचे कौतुक केले असून, काहींनी ती इंडस्ट्रीतील प्रेशरचं वास्तव समोर आणत असल्याचं म्हटलं आहे.
फिल्मफेअरमध्ये काजोलचा जलवा
अलीकडेच पार पडलेल्या ७०व्या हुंडई फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२५ मध्ये काजोलने आपल्या खास अंदाजाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या कार्यक्रमातील तिचा आणि शाहरुख खानचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. वर्क कल्चरवर सुरु असलेल्या चर्चेत काजोलने उडी घेतल्याने हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. दीपिका पदुकोणने कामाचे ठराविक तास मागितल्याने सुरू झालेली चर्चा आता इंडस्ट्रीतील सर्वच कलाकारांच्या जीवनशैलीकडे लक्ष वेधत आहे.











