Kalki 2898 AD या बहुचर्चित सायन्स फिक्शन चित्रपटाच्या सिक्वेलमधून अभिनेत्री दीपिका पदुकोण यांना बाहेर करण्यात आले आहे. ही माहिती स्वतः चित्रपटाचे निर्माते वैजयंती मूव्हीज यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून दिली आहे. या निर्णयामुळे दीपिकाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, कारण या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांनी चांगलीच पसंत केली होती.
वैजयंती मूव्हीजने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, दीपिका पदुकोण ‘कल्कि 2898 ए.डी.’च्या पुढील भागाचा भाग राहणार नाही. आम्ही अनेक विचारांती हा निर्णय घेतला आहे. पहिला भाग बनवताना एकत्र काम करण्याचा अनुभव उत्तम होता, मात्र सिक्वेलसाठी आवश्यक असलेली एकत्रित समजुत बनू शकली नाही. कल्कि 2898 ए.डी. सारख्या प्रोजेक्टसाठी केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे, तर पूर्ण समर्पणाची गरज असते. आम्ही दीपिकाला तिच्या आगामी प्रकल्पांसाठी शुभेच्छा देतो.

काय आहे नेमकं कारण? Kalki 2898 AD
या निर्णयामागचे खरे कारण काय आहे, हे अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार दीपिकाने चित्रपटाच्या शेड्युलसाठी फक्त 8 तासांच्या शूटिंगची अट ठेवली होती. निर्मात्यांना हे अडचणीचे वाटले, कारण या प्रकारच्या भव्य चित्रपटासाठी तासोंतास काम करण्याची तयारी लागते. यापूर्वीही दीपिका ‘Spirit’ नावाच्या एका चित्रपटातून बाहेर पडली होती, आणि त्यावेळीही अशीच अट असल्याची चर्चा होती. Kalki 2098 AD
दीपिकाची नवीन मागणी ?
याशिवाय काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की दीपिकाने 5 स्टार ट्रीटमेंटची अपेक्षा केली होती. त्यामध्ये तिच्या मानधनात 25 टक्के वाढ, आणि तिच्यासोबत 25 जणांची खासगी टीम ठेवण्याची मागणी होती. हे सर्व अटी निर्मात्यांना मान्य नसल्यामुळे शेवटी त्यांनी वेगळा मार्ग निवडला, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दीपिकाने ‘कल्कि 2898 ए.डी.’च्या पहिल्या भागात ‘सुमती’ नावाच्या एका गर्भवती महिलेची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ती प्रत्यक्षातही गर्भवती होती. तिच्या अभिनयाचे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून कौतुक करण्यात आले होते.
या चित्रपटाचा दुसरा भाग 2027 मध्ये प्रदर्शित होणार होता आणि काही भागांचे चित्रीकरण देखील पूर्ण झाले होते. मात्र दीपिकाच्या बाहेर पडण्यामुळे आता निर्मात्यांना नवीन अभिनेत्रीची निवड करावी लागणार आहे. आगामी काळात या सिक्वेलमध्ये कोणती नवी अभिनेत्री झळकते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.











