Kangana Ranaut On Rahul Gandhi : राहुल गांधी देशाला लागलेला कलंक; कंगना राणावतचा घणाघात

राहुल गांधी हे देशाचे कलंक आहेत. ते जिथे जिथे जातात तिथे भारताविषयी नकारात्मक आणि अवमानकारक वक्तव्य करत असतात

राहुल गांधी म्हणजे देशाला लागलेला कलंक आहे अशा शब्दांत भाजप खासदार आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत यांनी घणाघात केला (Kangana Ranaut On Rahul Gandhi) आहे..२ ऑक्टोबर २०२५ रोजी गांधी जयंतीनिमित्त दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना कंगना म्हणाली की, राहुल गांधी हे सातत्याने भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलीन करण्याचे काम करतात.

काय म्हणाली कंगना – Kangana Ranaut On Rahul Gandhi

कंगनांनी आपल्या वक्तव्यात म्हटले की, “राहुल गांधी हे देशाचे कलंक आहेत. ते जिथे जिथे जातात तिथे भारताविषयी नकारात्मक आणि अवमानकारक वक्तव्य करत असतात. ते भारतीय नागरिकांना भांडकुदळ, बेईमान आणि अडाणी दर्शवतात. अशा प्रकारे ते देशाच्या जनतेची आणि देशाची प्रतिमा घाणीत टाकत असतात. म्हणून मी त्यांना देशाचा कलंक म्हणते. राहुल गांधी यांना स्वतःच्या देशाबद्दल अभिमान वाटत नाही आणि देशालाही त्यांच्यामुळे लाज वाटते. Kangana Ranaut On Rahul Gandhi

ही वादग्रस्त प्रतिक्रिया कंगनांनी गांधी जयंतीच्या दिवशी दिल्लीत खादी खरेदीसाठी आयोजित कार्यक्रमात दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात २ ऑक्टोबर रोजी खादी खरेदी करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत कंगना या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांनी सांगितले की, “आज मी खादीची साडी आणि ब्लाऊज परिधान केला आहे. आपल्या स्वदेशी कापडांची आज संपूर्ण जगात मागणी आहे. हीच वेळ आहे आत्मनिर्भर भारत घडवण्याची.”

राजकीय वातावरण तापण्याची शक्यता –

या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांच्यावर केलेल्या या तीव्र वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे देशभरात गांधी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात असतानाच कंगनाने राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. कंगनाच्या या टीकेवरून अजून तरी काँग्रेस पक्ष किंवा राहुल गांधींकडून या टीकेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, आगामी राजकीय घडामोडींमध्ये या विधानाचा ठळक प्रभाव जाणवू शकतो.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News