Katrina Kaif Pregnant : कतरिना कैफ लवकरच आई होणार? चर्चांना उधाण, काय म्हणाला विकी कौशल?

सोशल मीडियावर कतरिनाच्या फोटो आणि व्हिडीओजवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस सुरू आहे.

बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि ग्लॅमरस जोडप्यांपैकी एक असलेल्या विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या आयुष्यात मोठा आनंद येणार असल्याच्या चर्चा सध्या जोरात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कतरिना कैफ या वर्षातच आईपणाचा अनुभव घेणार आहे (Katrina Kaif Pregnant) आणि सध्या ती तिच्या गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात आहे, अशी माहिती समोर आली असून याबाबतच्या चर्चाना उधाण आलंय…

चित्रपटसृष्टीपासून दूर… पण का? Katrina Kaif Pregnant

गेल्या काही महिन्यांपासून कतरिना कैफ कोणत्याही मोठ्या इव्हेंट्समध्ये किंवा चित्रपटांच्या प्रचारात दिसून आलेली नाही. ही गोष्ट तिच्या चाहत्यांच्या लक्षात आली आणि लगेचच गर्भधारणेच्या चर्चांना उधाण आलं. अभिनेत्रीच्या नजीकच्या सूत्रांनी यावर शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं जातं. सूत्रांच्या मते, “कतरिना अत्यंत खाजगी स्वभावाची आहे. ती तिच्या खास आयुष्याबाबत जास्त काही शेअर करत नाही. मात्र, ती लवकरच आई होणार आहे आणि बाळ जन्मल्यानंतर काही काळासाठी बॉलिवूडपासून पूर्ण ब्रेक घेण्याचा तिचा विचार आहे.”

राजस्थानमधील स्वप्नवत लग्न… आणि आता नवं पर्व

२०२१ मध्ये विकी आणि कतरिनाचं भव्य पण खासगी लग्न राजस्थानमधील सिक्स सेन्सेस फोर्ट, बरवाडा इथे पार पडलं होतं. त्यावेळी फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. तेव्हापासून हे जोडपं त्यांच्या नात्याबाबत नेहमीच खूप खाजगी राहिलं आहे. त्यामुळेच कतरिनाच्या गरोदरपणाच्या बातम्यांवर अद्याप दोघांपैकी कुणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. (Katrina Kaif Pregnant)

विकीने काय सांगितलं?

नुकत्याच ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये विकी कौशलला जेव्हा कतरिनाच्या गर्भधारणेच्या चर्चांबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्याने थेट उत्तर न देता हसत उत्तर दिलं “जोपर्यंत चांगली बातमी आहे, आम्हाला ती तुमच्यासोबत शेअर करण्यास आनंद होईल… पण सध्या या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही.” त्याच्या या उत्तरामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.

*चाहत्यांमध्ये उत्सुकता, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा*

सध्या सोशल मीडियावर कतरिनाच्या फोटो आणि व्हिडीओजवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस सुरू आहे. अनेकांना तिच्या बेबी बंपचे संकेत दिसले असल्याची चर्चा आहे.कतरिना कैफ आई होणार असल्याचं वृत्त अधिकृतपणे जाहीर होईल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पण एक गोष्ट नक्की  विकी आणि कतरिनाचं कुटुंब आता एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे, आणि चाहत्यांनीही आधीच स्वागतासाठी सज्ज व्हायला सुरुवात केली आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News