कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार! मोस्ट वॉन्टेड दहशतवादी कोण आहे? NIA ने ठेवलंय 10 लाखांचं बक्षीस!

Asavari Khedekar Burumbadkar

सुप्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्मा याने कॅनडामध्ये नव्यानेच उघडलेल्या रेस्टॉरंटवर  बुधवारी (दि.10)  रात्री गोळीबार करण्यात आलाय. कपिलने अवघ्या तीन दिवसांपूर्वी, म्हणजेच 7 जुलै रोजी, मोठ्या उत्साहात या कॅफेचं उद्घाटन केलं होतं. कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी यांनी काही दिवसांपूर्वीच हा कॅफे सुरू केला होता. कॅफे सुरू झाल्याच्या अवघ्या तीन दिवसांतच त्यावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

‘कप्स कॅफे’वरील हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कॅफे सुरू झाल्याच्या अवघ्या तीन दिवसांतच त्यावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती गाडीत बसून बंदुकीने कॅफेच्या दिशेने गोळ्या झाडताना दिसत आहे. या घटनेची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग उर्फ लड्डी याने घेतली आहे.  

कोण आहे हा हरजीत सिंग लड्डी ?

हरजीत सिंग एक खलिस्तानी दहशतवादी आहे. ज्याने कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामधील सरे येथील कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेमध्ये अंदाधुंद गोळीबार केला होता. गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणारा हरजीत सिंग लड्डी हा भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. ज्याच्यावर देशाच्या सुरक्षा एजन्सीने १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हरजीत हा बंदी घातलेल्या खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. भारतीय सुरक्षा संस्था बऱ्याच काळापासून त्याचा शोध घेत आहेत पण त्याचे नेमके ठिकाण सापडलेले नाही. तो जर्मनीमध्ये असल्याचे अनेक वेळा वृत्त होते. लड्डी पंजाबमधील नवांशहर या ठिकाणच्या गरपधाना गावातील रहिवासी आहे. गेल्या वर्षी पंजाबमध्ये विहिंपच्या विकास प्रभाकर यांच्या हत्येसह अनेक हत्याकांड आणि तशा प्रयत्नांमागे लड्डीचा हात होता, असा आरोप त्याच्यावर आहे.

गोळीबाराचे नेमके कारण काय?

हरजितसिंह याने हा हल्ला केला असला तरी त्यामागे त्याचा नेमका उद्देश स्पष्ट झालेला नाही. त्याला कपिल शर्माच्या कॅफेवरच गोळीबार करायचा होता? की या गोळीबाराच्या माध्यमातून त्याला कपील शर्माला फक्त धमकी द्यायची होती? हेही स्पष्ट झालेले नाही.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करी नाही.)

ताज्या बातम्या