Maharani 4 Trailer : हुमा कुरैशीच्या ‘महारानी 4’ चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

महारानी 4’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या सिझनमध्ये पुन्हा एकदा राणी भारतीची कथा पुढे सुरू होते.

हुमा कुरैशीची लोकप्रिय वेब सिरीज ‘महारानी’ (Maharani 4 Trailer) आता तिच्या चौथ्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिरीजने मागील तीन सीझन्समध्ये प्रेक्षकांचे भरभरून प्रेम आणि लोकप्रियता मिळवली आहे. आता ‘महारानी 4’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या सिझनमध्ये पुन्हा एकदा राणी भारतीची कथा पुढे सुरू होते. यामध्ये तिचा प्रवास बिहारच्या राजकारणातून दिल्लीच्या अधिक गुंतागुंतीच्या राजकीय खेळांपर्यंत पोहोचतो. ‘महारानी 4’ ही केवळ सत्तासंघर्षाची कथा नाही, तर राजगद्दीच्या लढाईची आणि त्यामधील विश्वासघाताच्या गुंतागुंतीच्या घटनांची मालिका आहे.

राणीचा धाडसी आणि सच्चा अवतार – Maharani 4 Trailer

राणी भारतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हुमा कुरैशी सांगते की, या सीझनमध्ये तिची भूमिका अधिक प्रगल्भ, उग्र आणि निडर अशी साकारण्यात आली आहे. तिच्या मते, हा राणीचा आतापर्यंतचा सर्वात धाडसी आणि सच्चा अवतार आहे. या सीझनचे दिग्दर्शन पुनीत प्रकाश यांनी केले असून, कांगडा टॉकीज प्रायव्हेट लिमिटेडने निर्मिती केली आहे. सिरीजची संकल्पना सुभाष कपूर यांची आहे. Maharani 4 Trailer

कोण कलाकार मुख्य भूमिकेत

यामध्ये हुमा कुरैशीसोबतच श्वेता बसु प्रसाद, विपिन शर्मा, अमित सियाल, विनीत कुमार, शार्दुल भारद्वाज, कनी कुसरुति आणि प्रमोद पाठक हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ‘महारानी सीझन 4’ ही वेब सिरीज 7 नोव्हेंबर 2025 पासून Sony LIV या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाली आहे आहे. त्यामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा राणी भारतीच्या सत्तेच्या संघर्षातील प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News