बॉलीवूडची हॉट अभिनेत्री आणि आपल्या फिटनेसमुळे सतत चर्चेत असणाऱ्या मलायका अरोराने एक मोठा सौदा केला आहे. मलाईकाने मुंबईतील अंधेरी पश्चिम मधील तिच्या आलिशान अपार्टमेंटची विक्री केली आहे. मलाईकाने तिचे अपार्टमेंट 5.3 कोटी रुपयांना विकले आहे. ऑगस्ट 2025 मध्ये हा करार झाला आहे. खरंतर मार्च 2018 मध्ये मलायकाने हे अपार्टमेंट ३.२६ कोटी रुपयांना खरेदी केले होते. म्हणजेच काय तर सात वर्षात तिला 2.04 कोटी रुपयांचा फायदा झाला….या करारात ३१.०८ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क देखील समाविष्ट होते. मुंबईतील रियल इस्टेट बिजनेस किती तेजीत आहे याचे हे सर्वोत्तम उदाहरण म्हणता येईल…
किती मोठं होतं मलायकाचे अपार्टमेंट – Malaika Arora
हे अपार्टमेंट १,३६९ चौरस फूट (कार्पेट एरिया) आणि १,६४३ चौरस फूट (बिल्ट-अप एरिया) मध्ये पसरलेले आहे, ज्यामध्ये कार पार्किंगच्या जागेचाही समावेश आहे. अंधेरी पश्चिमेतील हा परिसर त्याच्या उत्तम कनेक्टिव्हिटी आणि लक्झरी सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), गोरेगाव आणि अंधेरी पूर्व यासारख्या व्यावसायिक केंद्रांपर्यंत वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, एसव्ही रोड, उपनगरीय रेल्वे आणि वर्सोवा-घाटकोपर मेट्रो कॉरिडॉरद्वारे सहज पोहोचता येते.

मुंबईतील पॉश एरिया –
हा संपूर्ण एरिया लक्झरी एरिया म्हणून ओळखला जातो या ठिकाणी असलेल्या उंचच उंच इमारती प्रीमियम सोसायटी आणि मजबूत पायाभूत सुविधा यामुळे हे अपार्टमेंट मुंबईतील बेस्ट अपार्टमेंट मध्ये गणले जाते.
मलायकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती अनेकदा डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसते. अनेक चित्रपटांमधील तिचे डान्स सुद्धा खूप हिट झाले आहेत. यापूर्वी छैया छैया’ आणि ‘मुन्नी बदनाम हुई’ सारख्या गाण्यांमुळे मलायका चांगलीच प्रसिद्ध झाली होती. आता मलायकाचा आयुष्मान खुरानाच्या आगामी ‘थामा’ चित्रपटात डान्स करताना दिसेल.











