18 तास झोपतो बॉलिवूडचा सुपरस्टार, तोंडावर पाणी मारून जागं करावं लागतं

Smita Gangurde

बॉलिवूडचा हा मिस्टर परफेक्शनिस्ट सर्वांचा चाहता. त्याच्या चित्रपटांनी नवे पायंडे पाडले आहेत. तो त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. हा बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणजे आमिर खान. आमिर खान त्यांच्या कौटुंबिक गोष्टीमुळे बऱ्याचदा बातम्यांमध्ये असतो. अनेकदा तो माध्यमासमोर थेट बोलतो. एका मुलाखतीदरम्यान त्याने असाच एक किस्सा सांगितला होता. यामध्ये तो १८ तास झोपत असल्याची कबुली त्याने दिली होती. जेव्हापासून चाहत्यांना आपल्या परफेक्शनिस्ट हिरोबद्दल ही गोष्ट कळालीये, त्यांना धक्काच बसला आहे.

राज शमानी यांना दिलेल्या पॉडकास्टमध्ये आमिर खानने त्याच्या झोपेबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्याने त्याच्या एका चित्रपटाशी संबंधित एक किस्साही सांगितला. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झोपण्यासाठी आमिर खोटं बोलला होता.

सुपरस्टार १८ तास झोपतो

आमिर खान म्हणाला होता, ‘मी खूप गाढ झोपतो. एकदा मी झोपलो की मला उठवणं खूप कठीण असतं. आजही, माझ्या घरात काम करणाऱ्या संतोषचं सर्वात मोठं काम मला सकाळी उठवण्याचं असतं. त्याने जर मला वेळेवर उठवलं नाही तर मला उशीर तो मला वेळेवर उठवत नसेल तर मला उशीर होतो आणि जेव्हा मी उठत नाही तेव्हा त्यालाही त्रास होतो. तो आवाज करून थकतो. साधारण १५-२० वर्षांपासून असंच सुरू आहे. माझ्या बेडच्या शेजारी टेबलावर पाण्याचा स्प्रे ठेवला जातो. आपात्कालिन परिस्थितीत मला सकाळी जायचं असेल तेव्हा तो माझ्या चेहऱ्यावर स्प्रे करतो. हा ५-१० मिनिटे तो माझ्यावर तोंडावर स्प्रे करतो. त्यानंतर मी उठू शकतो.

झोपण्यासाठी खोटे बोलला…

आमिर खानने सांगितले, तोयश चोप्रांच्या चित्रपटासाठी काम करीत होता. चित्रपटाच्या फोटोशूटसाठी आमिरला सकाळी ८ वाजताची शिफ्ट देण्यात आली होती. पण तो सकाळी ११:३० वाजता उठला. उठल्यानंतर त्याने त्याची पत्नी रीनाला फटकारले. तिने त्याला का उठवले नाही. तेव्हा रीना म्हणाली की. तू म्हणाला होतास की सर्व शूटिंग रद्द झाले आहे, म्हणूनच तुला झोपू दिलं. उठल्यानंतर दहा मिनिटांनी आमिरने यश चोप्राला फोन केला आणि त्याला खरं काय ते सांगितले. झोपेतून न उठल्यामुळे तो शूटिंगला पोहोचू शकला नाही, असं तो म्हणाला.

ताज्या बातम्या