Narendra Modi Biopic : PM मोदींच्या जीवनावर आधारित ‘माँ वंदे’ बायोपिकची घोषणा; कोण साकारणार भूमिका?

उन्नी मुकुंदन ‘पीएम मोदी’च्या भूमिकेत दस्तऐवजावर स्वाक्षरी करताना दिसतात, आणि यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या खास निमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित एका भव्य बायोपिक चित्रपटाची (Narendra Modi Biopic) घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव  ‘माँ वंदे’, असून यामध्ये दक्षिण भारतीय अभिनेते उन्नी मुकुंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

या चित्रपटात नरेंद्र मोदी यांच्या बालपणापासून ते देशाचे सर्वोच्च नेते होईपर्यंतचा प्रवास मांडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, चित्रपटात त्यांच्या आयुष्यातील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या आई हीराबेन मोदी यांच्याशी असलेले भावनिक नातेदेखील अत्यंत संवेदनशील पद्धतीने सादर केलं जाणार आहे. ‘माँ वंदे’ या चित्रपटाची निर्मिती सिल्व्हर कास्ट क्रिएशन्स प्रॉडक्शन हाउस करत आहे. पहिल्या अधिकृत पोस्टरमध्ये, उन्नी मुकुंदन ‘पीएम मोदी’च्या भूमिकेत दस्तऐवजावर स्वाक्षरी करताना दिसतात, आणि यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सिनेमाची तांत्रिक बाजू होणार अत्याधुनिक आणि भव्य- Narendra Modi Biopic

या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रांती कुमार CH करत आहेत.
छायाचित्रणाची जबाबदारी ‘बाहुबली’ फेम केके सेंथिल कुमार ISC यांच्याकडे आहे, त्यामुळे दृश्ये भव्य आणि प्रभावशाली असणार हे निश्चित मानलं जात आहे. रवि बसरूर संगीत देणार असून, श्रीकर प्रसाद संपादनाची जबाबदारी सांभाळतील. प्रॉडक्शन डिझाईन साबू सिरील तर अ‍ॅक्शन कोरियोग्राफी किंग सोलोमन यांच्याकडे असणार आहे. (Narendra Modi Biopic)

उन्नी मुकुंदन: दक्षिणेकडून दिल्लीपर्यंतचा प्रवास

2024 मध्ये आलेल्या ‘मार्को’ या चित्रपटामुळे उन्नी मुकुंदन चर्चेत आले होते. हिंसक अ‍ॅक्शन शैलीतील त्यांच्या भूमिकेला खूप पसंती मिळाली होती. याशिवाय ते ‘गेट सेट बेबी’ आणि आगामी ‘मिंडियम परंजुम’ चित्रपटासाठीही चर्चेत आहेत.‘माँ वंदे’ या चित्रपटातून फक्त नरेंद्र मोदींचा राजकीय प्रवास नव्हे, तर एक सामान्य घरातील मुलगा कसा देशाचा पंतप्रधान बनतो, याची कहाणी आपल्यासमोर येणार आहे. चित्रपटात संघर्ष, कष्ट, आदर्श आणि प्रेरणेचा ठसा उमटवण्याची पूर्ण तयारी आहे.

भारतीय राजकारणातील टप्प्याटप्प्यांची झलक आणि मानवी भावना यांचं समर्पक मिश्रण असलेली ही बायोपिक प्रेक्षकांना निश्चितच मंत्रमुग्ध करेल. सध्या चित्रपटाची निर्मिती प्रक्रियेत असून, त्याच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर होणार आहे. परंतु मोदी समर्थक आणि सिनेरसिक दोघांमध्येही या चित्रपटाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News