बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते राकेश रोशन यांचा आज 76 वा वाढदिवस आहे. (Rakesh Roshan Birthday)आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त हृतिक रोशन ने सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर केले आहे. आपल्या वडिलांनी जीवनात धैर्य आणि ताकतीने कस लढायला शिकवले हे ऋतिकने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
ऋतिक ने वडिलांसोबतचे फोटो शेअर केले –
ऋतिकने शेअर केलेल्या एका फोटोत हृतिक त्याच्या कुटुंबाबरोबर वाढदिवस साजरा करताना दिसत आहे आणि त्याचे वडील राकेश त्याच्या शेजारी उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये हृतिक राकेश रोशन यांच्या मांडीवर बसल्याचे दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये हृतिक आणि राकेश यांच्याबरोबर पिंकी रोशन आणि सुनैना रोशनबरोबर दिसत आहे.

काय आहे ऋतिक रोशनची पोस्ट?? Rakesh Roshan Birthday
ऋतिक रोशन ने इंस्टाग्राम वर राकेश रोशन यांच्या वाढदिवसानिमित्त भावनिक पोस्ट शेअर केली आहे आणि वडिलांबद्दल त्याच्या मनातील भावना केल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये ऋतिक म्हणतो, “वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा. परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तुम्ही माझ्यात लवचिकता निर्माण केलीत. त्यामुळे जेव्हा आयुष्य कठीण वाटते, तेव्हा माझ्यातल्या या लवचिकतेमुळेच त्या कठीण प्रसंगाला सामोरे जाणे सुसह्य होते. आयुष्यातील कोणतेही संकट माझ्यातल्या सैनिकाला हरवू शकत नाही.
ऋतिकने पुढे लिहिले आहे की, “गेल्या काही वर्षांत, मी एखाद्या गोष्टीची दुसरी बाजूदेखील बघायला शिकलो आहे आणि मला माहित आहे की तुम्हीही तेच शिकला आहात. तुमचे अंतर्गत मूल्य, फक्त असण्याची साधेपणा आणि बाह्य मान्यता कमी होणे हे शोधत आहात.
हृतिकने या भावनिक शब्दांनी त्याच्या नोटचा शेवट केला, लिहिले, “कठीण मार्ग स्वीकारला म्हणूनच माझ्यामध्ये शहाणपण आले. माझ्यात तो सैनिक निर्माण केल्याबद्दल, तुम्ही सर्वोत्तम शिक्षक असल्याबद्दल धन्यवाद! मी तुमचा मुलगा आहे, याचा मला खूप अभिमान आहे. मी तुमच्यावर प्रेम करतो.











