नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली अभिनेत्री आणि सोशल मीडियावर वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाणारी राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण आहे तिचं एक धक्कादायक वक्तव्य…. राखी सावंत ने म्हटलं आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील आहेत!” एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर राखीने पापाराझींशी संवाद साधताना हे विधान केलं. ती म्हणाली, “माझ्या आईनं मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात ती म्हणाली होती की, डोनाल्ड ट्रम्पच माझे खरे वडील आहेत.” हे ऐकताच उपस्थित सर्वजण क्षणभर थबकलेच.
दुबईहून परतलेल्या राखीचा नवा ‘पंगा’ Rakhi Sawant
राखी तिच्या आईच्या निधनानंतर काही काळ दुबईत स्थायिक झाली होती. आता ती भारतात परतली असून एका नव्या रिअॅलिटी शोच्या शूटिंगसाठी मुंबईत आली आहे. ‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमाच्या सेटवरून बाहेर पडताना तिला पापाराझींनी घेरलं. त्या वेळी तिने नेहमीप्रमाणे नाच करत उपस्थितांचं लक्ष वेधलं आणि त्यानंतर दिलं हे आश्चर्यचकित करणारं वक्तव्य.

पंगा मत लो… जा रही हूं बिग बॉस में
तिच्या (Rakhi Sawant) विधानावर पापाराझींनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “ट्रम्प तर सध्या मोदींना त्रास देत आहेत.” यावर राखीने हात जोडत उत्तर दिलं, “Thank you so much. मेरे से पंगा ना लो.” याचदरम्यान तिने ‘बिग बॉस’मध्ये जाण्याची सूचनाही दिली आणि “जा रही हूं बिग बॉस में… धमाका मचाऊंगी!” असं म्हणत तिथून निघून गेली.
नेटकऱ्यांचा संताप
राखीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली आहे. अनेकांनी तिच्या ‘नाटकबाजी’वर टीका केली आहे. काहींनी विचारलं, “ही नक्की कोणता नशा करते?” तर काहींनी थेट तिच्या आईचा अपमान होत असल्याचं सांगत संतप्त प्रतिक्रिया दिल्या. एका नेटकऱ्यानं लिहिलं, “आईविषयी अशा प्रकारे बोलणं म्हणजे नात्यांचं विटंबन आहे.” तर दुसऱ्यानं लिहिलं, “राखी आली आणि लगेच ड्रामा सुरू झाला!”
राखी सावंत आणि वाद हे समीकरण जुने
तसं बघितलं तर राखी सावंतसाठी वादग्रस्त विधानं ही काही नवीन गोष्ट नाही. आधीही ती अनेकदा अशा वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली आहे. मात्र यावेळी तिचं विधान थेट आंतरराष्ट्रीय राजकारणाशी संबंधित असल्यामुळे याला अधिकच प्रसिद्धी मिळत आहे.