‘थामा’च्या प्रदर्शनापूर्वी साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले रश्मिका मंदाना आणि आयुष्मान खुराना

आज मंगळवारी सकाळी रश्मिका आणि आयुष्मान शिर्डीच्या पवित्र भूमीत पोहोचले. त्यांनी साईबाबांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले आणि त्यांच्या चरणांमध्ये माथा टेकून आशीर्वाद मागितला.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार रश्मिका मंदाना आणि आयुष्मान खुराना लवकरच त्यांच्या नवीन चित्रपट ‘थामा’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपट २१ ऑक्टोबर रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. रिलीजपूर्वी चित्रपटाच्या यशासाठी आणि भक्तीभावाने आशीर्वाद घेण्यासाठी या दोन्ही कलाकारांनी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भेट दिली.

दोघेही पारंपरिक वेशभूषेत –

आज मंगळवारी सकाळी रश्मिका आणि आयुष्मान शिर्डीच्या पवित्र भूमीत पोहोचले. त्यांनी साईबाबांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले आणि त्यांच्या चरणांमध्ये माथा टेकून आशीर्वाद मागितला. दोघेही पारंपरिक वेशभूषेत दिसले. आयुष्मानने क्रीम रंगाचा कुर्ता-पायजामा परिधान केला होता, तर रश्मिका पारंपरिक सूटमध्ये आणि डोक्यावर दुपट्टा घेतलेली होती. त्यांच्या हातात साईबाबांना अर्पण करण्यासाठी गुलाबाची फुलेही होती.

आयुष्मान 17 वर्षानंतर साईचरणी

दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना आयुष्मान खुरानाने सांगितले की, तो १७ वर्षांनंतर पुन्हा साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत आला आहे आणि यावेळीही त्याला एक अतिशय सकारात्मक आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळाली आहे. रश्मिकाने सांगितले की, ही तिची दुसरी वेळ आहे आणि प्रत्येक वेळी ती इथे येते, तेव्हा तिच्या मनाला समाधान आणि शांती मिळते. शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानने दोघांचाही सन्मान केला. या भेटीनंतर दोघांच्याही फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला असून, त्यांच्या साधेपणाचं आणि श्रद्धेचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

‘थामा’ या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊस ‘मॅडॉक युनिव्हर्स’ने केली आहे. ही त्यांची पाचवी फिल्म असून यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव घेऊन येणार आहे. चित्रपटात रोमँटिक कॉमेडी, हॉरर आणि थ्रिल यांचा अनोखा मिलाफ पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाचं कथानकही फारच वेगळं आहे. यामध्ये आयुष्मान खुराना एक सामान्य माणूस असतो जो अचानक एका विचित्र घटनांमुळे व्हँपायर बनतो. त्याच्या आयुष्यात रश्मिकाची एंट्री होते आणि तिथून सुरू होते एका रोमँटिक आणि साहसी प्रवासाची कहाणी. त्यात भर म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी तांत्रिकाची भूमिका साकारली आहे, जो संपूर्ण जगावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करतो.

‘थामा’मधील गाणीही विशेष लक्षवेधी ठरत आहेत. नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘पॉइजन बेबी’ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या गाण्यात मलायका अरोरा आणि रश्मिका मंदानाने त्यांच्या ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. गाण्याला जैस्मीन सैंडलस, दिव्या कुमार आणि सचिन-जिगर यांचं दमदार संगीत लाभलं आहे. आता सर्वांचे लक्ष २१ ऑक्टोबरकडे लागले आहे, जेव्हा ‘थामा’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि बॉक्स ऑफिसवरील कामगिरी काय असेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News