अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘थामा’मुळे चर्चेत आहे, मात्र यावेळी ती आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिचा अभिनेता विजय देवरकोंडा सोबत साखरपुडा झाल्याची माहिती समोर आली होती. आता रश्मिकाने स्वतःच्या हातातील डायमंड एंगेजमेंट रिंग दाखवत ही बातमी अप्रत्यक्षपणे मान्य केल्याचं स्पष्ट होत आहे.
रश्मीकाचा विडिओ चर्चेत – Rashmika Mandanna
रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या पाळीव कुत्र्याला ‘थामा’ चित्रपटातील गाणं ऐकवत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या डाव्या हाताच्या अनामिकेवर एक सुंदर डायमंड रिंग दिसत आहे. हीच रिंग तिच्या साखरपुड्याची असल्याचं अनेक चाहत्यांनी ओळखलं आहे आणि या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते रश्मिकाला शुभेच्छा देत आहेत. अनेकांनी कमेंट करत साखरपुडा निश्चित झाल्याचं म्हटलं आहे. काही युजर्सनी तर लिहिलं की “शेवटी आम्हाला रिंग दिसली” आणि “हा पूर्ण व्हिडीओ फक्त रिंग दाखवण्यासाठी आहे”. रश्मिकाच्या चाहत्यांनी तिच्या वैयक्तिक आयुष्यातील या नव्या टप्प्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
अधिकृत घोषणा कधी?
रश्मीकाच्या (Rashmika Mandanna) विडिओ पूर्वी विजय देवरकोंडानेही एका व्हिडीओद्वारे स्वतःची एंगेजमेंट रिंग दाखवली होती. त्यामुळे दोघांनीही एकमेकांच्या साखरपुड्याच्या बातमीवर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केल्याचं मानलं जात आहे. त्यांच्या या कृतीमुळे दोघांचे चाहते खूप उत्साही आणि आनंदी झाले आहेत. तरीही, रश्मिका आणि विजय यांच्याकडून अधिकृत घोषणा अद्याप आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर दोघांची रिंग फ्लाँट करण्याची शैली पाहता हे नातं आता अधिकृत करण्यास फार वेळ लागणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे. चाहते आता त्यांच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा कधी होते याची आतुरतेने वाट पाहत आहेत.