Rashmika Mandanna : साखरपुड्याच्या चर्चेनंतर रश्मिका मंदानाची पहिली पोस्ट; म्हणाली, मला माहितीय…

जरी रश्मिकाने साखरपुडा बद्दल अधिकृतपणे कोणतीही पुष्टी केलेली नाही, तरी तिच्या आणि विजयच्या जोडीला मिळणाऱ्या प्रतिसादावरून हे स्पष्ट आहे की ही जोडी चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण करून बसली आहे

हैदराबाद  साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांनी सध्या सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडवून दिली. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ३ ऑक्टोबर २०२५ रोजी हैदराबादमध्ये एका खासगी समारंभात या दोघांनी साखरपुडा केला. चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, आणि सोशल मीडियावर सतत दोघांच्या जोडीसंबंधी चर्चांना उधाण आलं आहे.दरम्यान, या अफवांनंतर अभिनेत्री रश्मिका मंदानाने आपलं पहिलं इंस्टाग्राम पोस्ट शेअर केलं आहे. मात्र, या पोस्टमधून तिनं साखरपुडाबद्दल काहीही स्पष्ट न करता, चाहत्यांना सरप्राइझ दिलं आहे. रश्मिकाने आपल्या आगामी चित्रपट ‘द गर्लफ्रेंड’ चा टीझर शेअर करत त्याच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.

काय आहे रश्मिका ची पोस्ट Rashmika Mandanna

ती म्हणाली, “मला माहित आहे की तुम्ही याची वाट पाहत होतात आणि ही घ्या… #TheGirlfriend ७ नोव्हेंबर २०२५ पासून थिएटर्समध्ये… तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळममध्ये.” रश्मिकाच्या या पोस्टवर काही क्षणांतच चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. अनेक युजर्सनी फिल्मचा टीझर आवडल्याचं सांगितलं, तर काहींनी थेट तिच्या सगाईविषयी प्रश्न विचारले. एका युजरने कमेंटमध्ये विचारलं

“साखरपुडा झाल्याचं खरंय का?” दुसऱ्याने लिहिलं “एक्साइटमेंट रिअल आहे, आम्ही ७ नोव्हेंबरची आतुरतेने वाट पाहत आहोत. संपूर्ण टीमला शुभेच्छा!” तर तिसऱ्या युजरने म्हटलं  “भारताची बेस्ट जोडी – रश्मिका मॅम आणि विजय.” (Rashmika Mandanna)

रोमँटिक ड्रामा मुव्ही

रश्मिकाचा हा आगामी चित्रपट ‘द गर्लफ्रेंड’ हा एक रोमँटिक-ड्रामा असून त्याचं दिग्दर्शन अभिनेता-दिग्दर्शक राहुल रविंद्रन करत आहेत. यात रश्मिकासोबत अभिनेता धीक्षीथ शेट्टी झळकणार आहेत. टीझरमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये दोघांच्या संवादाने सुरुवात होते, जे संपूर्ण चित्रपटाच्या टोनची झलक देतं. विशेष म्हणजे, विजय देवरकोंडाने या चित्रपटासाठी वॉइसओव्हर दिला आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

जरी रश्मिकाने साखरपुडा बद्दल अधिकृतपणे कोणतीही पुष्टी केलेली नाही, तरी तिच्या आणि विजयच्या जोडीला मिळणाऱ्या प्रतिसादावरून हे स्पष्ट आहे की ही जोडी चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण करून बसली आहे. चित्रपटाच्या टीझरने जरी सिनेमाची चर्चा सुरू केली असली, तरी रिअल लाईफमधील त्यांच्या नात्याची पुष्टी होण्यासाठी सध्या सगळे डोळे त्यांच्या पुढील पोस्टकडे लागले आहेत.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News