Rekha : रेखा फक्त टाइमपास? दिग्गज अभिनेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

अभिनेता जितेंद्र यांनी एकेकाळी रेखा ही "फक्त टाइमपास होती" असा अवमानकारक उल्लेख केल्याची माहिती नुकतीच समोर आली असून, या वक्तव्यामुळे रेखाच्या आयुष्यातील एक वेदनादायी पर्व पुन्हा उजेडात आले आहे.

बॉलिवूडमधील एकेकाळची ग्लॅमरस आणि बहुचर्चित अभिनेत्री रेखा (Rekha) पुन्हा एकदा चर्चेच्या झोतात आली आहे. मात्र, यावेळी कारण तिचा अभिनय नव्हे, तर एका दिग्गज अभिनेत्याच्या जुन्या पण संतापजनक वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता जितेंद्र यांनी एकेकाळी रेखा ही “फक्त टाइमपास होती” असा अवमानकारक उल्लेख केल्याची माहिती नुकतीच समोर आली असून, या वक्तव्यामुळे रेखाच्या आयुष्यातील एक वेदनादायी पर्व पुन्हा उजेडात आले आहे.

काय आहे विषय?

रेखा आणि जितेंद्र, 70-80 च्या दशकात हे नाव जिथे जिथे घेतले जायचे, तिथे यशस्वी सिनेमांची नावे जोडली जात. ‘अजूबा’, ‘धरम करम’, ‘बिचारा’ अशा अनेक चित्रपटांतून दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली होती. मात्र पडद्यामागे त्यांच्या नात्यात एक अस्वस्थता होती, जी आता उघडकीस येऊ लागली आहे.

चित्रपटाच्या सेटवर रेखाबद्दल केलेले एक वक्तव्य तिच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेले. ‘बेचारा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, जितेंद्रने एका सहकलाकारासोबत बोलताना रेखा ही “फक्त टाइमपास” आहे, असे म्हटल्याचे समोर आले. ही गोष्ट जेव्हा रेखाच्या कानावर पोहोचली, तेव्हा ती इतकी व्यथित झाली की, रडत रडत सेट सोडून गेल्याची आठवण त्या काळातील काहीजण आजही सांगतात.

रेखाच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा Rekha 

रेखाचे नाव बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांसोबत जोडले गेले. अमिताभ बच्चन, विनोद मेहरा, जितेंद्र, अगदी काही अफवांमध्ये अक्षय कुमार व संजय दत्तसुद्धा. मात्र, या प्रत्येक नात्यामध्ये रेखाला एकतर्फी भावना किंवा अपूर्णतेचा अनुभव आला. स्वतःच्या अभिनयाने लाखोंच्या मनात जागा निर्माण करणाऱ्या या अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याची मात्र सातत्याने खिल्ली उडवली गेली, हे स्पष्ट दिसून येते.

१९९० चं लग्न आणि नंतरचा एकाकी प्रवास

व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी रेखाचं 1990 मध्ये झालेलं लग्न आणि त्यानंतर काही महिन्यांतच झालेली त्यांच्या पतीची आत्महत्या  हे प्रकरण आजही गूढतेच्या धुक्यात हरवलेलं आहे. रेखाने त्या घटनेनंतर पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि आजही ती एकटी राहते. तिच्या आयुष्यातील या शांत, पण वेदनादायी पर्वावर फारसा कोणी प्रकाश टाकला नाही.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News