Rishab Shetty : सूजलेल्या पायांनी ‘KantaraChapter1’चा क्लायमॅक्स शूट; ऋषभ शेट्टीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Asavari Khedekar Burumbadkar

कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) सध्या आपल्या ब्लॉकबस्टर हिट ‘कांतारा चैप्टर 1’च्या यशामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं असून बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र अलीकडेच ऋषभ शेट्टीने या यशामागची खरी मेहनत उघड केली आहे.सोशल मीडियावर शेअर केलेल्या बीटीएस (बिहाइंड द सीन) फोटोमध्ये ऋषभने उघड केलं की, चित्रपटातील इंटेन्स क्लायमॅक्स सीन त्याने सूजलेल्या पायांनी आणि थकलेल्या शरीराने शूट केला. त्याच्या पायांवरील सूज स्पष्टपणे फोटोमध्ये दिसत असून, त्याच्या समर्पणाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये ऋषभने (Rishab Shetty) लिहिले, “क्लायमॅक्स शूट दरम्यान ही अवस्था होती सूजलेले पाय, थकलेलं शरीर… पण आज हा सीन लाखो लोकांच्या पसंतीस उतरतोय. हे सर्व आमच्या श्रद्धेच्या दिव्य ऊर्जेच्या आशीर्वादामुळे शक्य झालं. सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार.”

चाहत्यांची प्रतिक्रिया – Rishab Shetty

या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत आहेत. कुणी त्याला “प्रेरणादायी कलाकार” म्हटलं, तर कुणी “खरं समर्पण असं असतं” अशा शब्दांत गौरव केला. ‘कांतारा चैप्टर 1’ हा चित्रपट कर्नाटकमधील तुळुनाड प्रदेशातील लोककथांवर आधारित असून, निसर्ग, परंपरा आणि मानवी संघर्ष यावर केंद्रित आहे. ऋषभने या चित्रपटात केवळ अभिनयच नाही, तर लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारीही पार पाडली. चित्रपटातील त्याचा वाघासारखा अवतार, नृत्य आणि ॲक्शनचं परफॉर्मन्स प्रेक्षकांना थक्क करतं.

400 कोटींपेक्षा जास्त कमाई

हा चित्रपट 400 कोटींपेक्षा जास्त कमाई करून ऑस्करसाठीही सबमिट झाला आहे. ऋषभची ही मेहनत ‘कांतारा’च्या यशाचं गमक ठरत आहे. जंगलात महिन्यन्‌महिने शूटिंग करणं, स्थानिक कलाकारांसोबत काम करणं आणि प्रत्येक सीन वास्तवदर्शी वाटावा यासाठी घेतलेली जोखीम हे सर्व त्याच्या समर्पणाचं प्रतीक आहे.चित्रपटातील सूजलेल्या पायांमागची ही कथा उघड झाल्याने प्रेक्षकांमध्ये अधिक भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत. आता ‘कांतारा चैप्टर 2’ची तयारी जोरात सुरू असून, त्यात ऋषभचा पात्र आणखी गहिरा होणार आहे. फॅन्ससाठी ही माहिती अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.

ताज्या बातम्या