अहान पांडेच्या पहिल्याच चित्रपटाने बनवले ७ रेकॉर्ड्स, कमाईमध्ये हृतिक-अभिषेकच्या चित्रपटांना टाकले मागे

Aiman Jahangir Desai

Saiyaara box office collection:   अहान पांडेचा पहिलाच म्युझिकल रोमँटिक लव्हस्टोरी चित्रपट ‘सैयारा’ प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील अहान पांडे आणि अदिती पद्ढा यांची प्रेमकथा तरुणांना भावनिक करत आहे.

१८ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सैयारा’ या चित्रपटाने पहिल्या दिवशीच्या कमाईने अनेक विक्रम केले आहेत. यशराज बॅनरखाली बनलेला ‘सैयारा’ हा चित्रपट मोहित सुरी दिग्दर्शित आहे आणि हा त्याच्या चित्रपट दिग्दर्शनाच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. चला जाणून घेऊया ‘सैयारा’ने पहिल्या दिवशी किती कमाई केली आणि कोणते रेकॉर्ड केले.

 

रिलीजच्या पहिल्या दिवशी ‘सैयारा’ने केले ७ विक्रम-

 

१. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्याच्या चित्रपटाचा पहिल्या दिवशीचा सर्वाधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन.

२. भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘प्युअर लव्हस्टोरी’चा पहिल्या दिवशीचा सर्वाधिक कलेक्शन.

३. २००० नंतर पदार्पण करणाऱ्या अभिनेत्याच्या चित्रपटाचा पहिल्या दिवशीचा सर्वाधिक तिकिटांचा संग्रह.

४. ‘कहो ना प्यार है’ आणि ‘रिफ्यूजी’ (२०००) नंतर २५ वर्षांत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्याच्या चित्रपटाच्या पहिल्या दिवशी विकल्या गेलेल्या सर्वाधिक तिकिटांची संख्या.

५. मोहित सुरीच्या चित्रपट कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ‘सैयारा’ आहे.

६. कोविड १९ नंतर लव्हस्टोरी चित्रपटाची सर्वात मोठी ओपनिंग.

७. कोविडनंतर एकाच दिवसात २० कोटींचा निव्वळ कलेक्शन ओलांडणारा पहिला लव्हस्टोरी चित्रपट.

 

८००० शोमधून काढले कमाईचे आकडे-

 

सैयाराचे हे आकडे भारतातील फक्त ८,००० शोमधून काढले आहेत. साधारणपणे २० कोटी रुपयांपेक्षा जास्त ओपनिंगसाठी १८,००० शोपैकी निम्म्याहून कमी शो लागतात. सैयारा या चित्रपटाचे मुख्य कलाकारांसह कोणतेही मार्केटिंग आणि प्रमोशन नव्हते. मोठे शहर दौरे नव्हते, मुलाखती नव्हत्या, सोशल मीडिया रील्स नव्हते, कोणत्याही सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची मदत नव्हती. तरीसुद्धा या चित्रपटाच्या ओपनिंगने सर्वांना चकित केले आहे.

ताज्या बातम्या