मी स्वत: भाजपचा आणि पंतप्रधान मोदींचाही भक्त आहे, मुंबईत भाजपचाच महापौर बसेल असे विधान केल्यानंतर मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्यावर राजकीय टीकाटिप्पणी सुरु झाली आहे. यात मागे राहतील ते संजय राऊत कसले, संजय राऊत यांनीही महेश कोठारे यांच्या विधानावर तोंडसुख घेऊन (Sanjay Raut Slam Mahesh Kothare) त्यांना कडक शब्दात सुनावल आहे.. महेश कोठारे हे नक्की मराठीच आहेत ना असा सवाल करत रात्री तात्या विंचू तुमचा गळा दाबेल अशा शब्दात संजय राऊतांनी महेश कोठारे यांच्यावर निशाणा साधला.
महेश कोठारे हे नक्की मराठीच आहेत ना? Sanjay Raut Slam Mahesh Kothare
प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊताना महेश कोठारे यांनी केलेल्या विधानाबाबत छेडण्यात आले, त्यावेळी राऊत म्हणाले, महेश कोठारे हे नक्की मराठीच आहेत ना? मला याबद्दल शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्या. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात. तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनीच बघितले नाहीत. तुम्ही जर असे काही बोलत राहिला तर त्यात्या विंचू रात्री येऊन तुम्हाला चावेल आणि गळाही दाबेल, अशा शब्दात संजय राऊतांनी महेश कोठारेला सुनावल. Sanjay Raut Slam Mahesh Kothare

महेश कोठारे नेमकं काय म्हणाले होते?
भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मागाठाणे परिसरात आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलताना महेश कोठारे म्हणाले होते की, भाजप म्हणजे आपले घर आहे. मी स्वत: भाजपचा भक्त आहे. मी पंतप्रधान मोदींचाही भक्त आहे. आपल्याला इथून नगरसेवक निवडून आणायचा आहे. तसेच यावेळी महापौरही इथून निवडून गेलेला असेल. मुंबईत नक्कीच कमळ फुलेल. मी जेव्हा पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा मी म्हटलं होतं की, येथील मतदार हे खासदार निवडून देत नाहीत तर केंद्रीय मंत्री म्हणून निवडून येत आहेत. आताही आपण या विभागातून फक्त नगरसेवक निवडून देणार नाही. तर भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची ठरवली तर उद्या या विभागातून मुंबईचा महापौर निवडला जाईल.











