‘किंग’ सिनेमाच्या सेटवर शाहरुखला दुखापत? अमेरिकेत ऑपरेशनंतर एका महिन्याची विश्रांती दिल्याची चर्चा  

Smita Gangurde

मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला एका सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी दुखापत झाली अशी माहिती समोर आली आहे. मुंबईच्या गोल्डन टोबॅको स्टुडिओत शूटिंगच्या  वेळी ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. शाहरुखला नेमकी जखम कधी झाली आणि कुठे  झाली याची माहिती अद्याप नसली तरी उपचारासाठी शाहरुख खान त्याच्या टीमसोबत अमेरिकेला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. झालेली दुखापत मोठी असल्याचं सांगण्यात येत असून त्याच्यावर सर्जरी झाल्याचीही माहिती आहे. डॉक्टरांनी शाहरुखला एक महिन्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिल्याचंही  सांगण्यात येतंय.

किंगमध्ये मुलगी सुहानासोबत दिसणार शाहरुख

किंग सिनेमा 2026 मध्ये रीलिज होणार आहे. सिद्धा आनंद या सिनेमाचे दिग्दर्शक आहेच. या  सिनेमात शाहरुख खानसोबत त्याची  मुलही सुहाना, दीपिका पादुकोन, राणी मुखर्जी अभिषेक बच्चन आणि अनिल कपूर हे अभिनेतेही दिसणार आहेत.

शाहरुखला झालेल्या  दुखापतीमुळे आता सिनेमाचं शूटिंग पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. आता नव्या शेड्यूलनुसार सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये  पुढील शूटिंग होणार असल्याचं सांगण्यात येतंय. जुलै ते ऑगस्ट या काळात मुंबईतील फिक्म सिटी, गोल्डन टोबॅको स्टुडिओ आणि वायआरएफ स्टुडिओत या  सिनेमाचं  शूटिंग होणार होतं. मात्र शाहरुखच्या  दुखापतीमुळे या तारखा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. किंग सिनेमाचं  शूटिंग भारत आणि युरोपात होणार आहे. आता शाहरुख पूर्ण बरा झाल्यानंतर नव्या  तारखा जाहीर करण्यात येणार आहेत.

शाहरुखला यापूर्वीही झाल्या आहेत दुखापती

सिनेमाच्या चित्रीकरणावेळी शाहरुख दुखापतग्रस्त होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याला शूटिंगदरम्यान अशा दुखापती झालेल्या आहेत.

1993- डर सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी सापळ्याला दुखापत झाली होती. एका एक्शन सीनमध्ये उजव्या  पायाचा अंगठाही दुखावला गेला होता.

1997- सिनेमा कोयलाच्या शूटिंगच्या  वेळी शाहरुखच्या गुडघ्याला फॅक्चर झालं होतं.

2003-  कल हो ना हो या सिनेमाच्या शूटिंगच्यावेळीही शाहरुख खानच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्यावेळी जर्मनीत त्याच्यावर सर्जरी करण्यात आली होती.

2009- ब्रीच कँडी रुग्णालयात शाहरुखच्या डाव्या खांद्याची सर्जरी करण्यात आली होती. डॉन 2 किंना दुल्हा मिल गया या सिनेमाच्या  शूटिंगवेळी ही जखम झाल्याची माहिती होती.

2013- चैन्नई एक्सप्रेसच्या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. यावर लंडनमध्ये सर्जरी करण्यात आली.

2014- हॅपी न्यू इयरच्या  सिनेमाच्या शूटिंगवेळी शाहरुखवर हॉटेलचा दरवाजा कोसळला होता. चेहऱ्याला आणि गुडघ्याला दुखापत झाली होती.

2015- पॅन सिनेमाच्या शूटिंगवेळी गुडघ्याला दुखापत, रीही दिलवाले आणमि रईसचं शूटिंग बिना ब्रेक केलं होतं.

ताज्या बातम्या