बॉलीवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खान आपल्या दरवर्षीच्या भव्य दिवाळी पार्टीसाठी ओळखला जातो. ‘मन्नत’ या त्याच्या आलिशान बंगल्यात दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने आयोजित केली जाणारी ही पार्टी (Shahrukh Khan Diwali Party Cancelled) म्हणजे ग्लॅमर, भव्यता आणि बॉलीवूडच्या सेलिब्रिटींच्या जंगी उपस्थितीचा संगम असतो. मात्र यंदा चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. कारण यंदा शाहरुख खान दिवाळी पार्टी आयोजित करणार नाहीत.
काय आहे कारण? Shahrukh Khan Diwali Party Cancelled
फ्री प्रेस जर्नलच्या अहवालानुसार, शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले की, सध्या ‘मन्नत’ या बंगल्याचं मोठं रेनोव्हेशन (दुरुस्ती आणि सजावट) सुरू आहे. त्यामुळे यंदा पार्टी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या शाहरुख आपल्या पत्नी गौरी खान आणि मुलं आर्यन, सुहाना आणि अबराम यांच्यासह मुंबईच्या पाली हिल भागातील एका अपार्टमेंटमध्ये राहतो आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे ‘मन्नत’मध्ये होणारा दिवाळीचा सोहळा यंदा रंगणार नाही. Shahrukh Khan Diwali Party Cancelled

मोठमोठ्या बॉलिवूड कलाकारांचा असतो सहभाग
शाहरुख खानच्या दिवाळी पार्टीमध्ये दरवर्षी बॉलीवूडमधील मोठमोठे कलाकार सहभागी होतात. कतरिना कैफ, आलिया भट्ट, करण जोहर, काजोल, जूही चावला, आमिर खान, विद्या बालन, करीना कपूर, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग अशा अनेक नामवंत कलाकारांची उपस्थिती ही या पार्टीचा मुख्य आकर्षण असते. मन्नतमधील ही पार्टी केवळ एक सेलिब्रिटी गेट-टुगेदर नसून, ती तिच्या भव्य डेकोरेशन, राजेशाही पाहुणचार आणि खास सोहळ्यासाठी ओळखली जाते. मात्र यावर्षी हे सर्व नजारे पाहायला मिळणार नाहीत.
शाहरुख खानच्या पार्टीची वैशिष्ट्ये
शाहरुख खानची दिवाळी पार्टी ही केवळ चकाकी आणि सेलिब्रिटींनी भरलेली नसते, तर ती त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक नमुना देखील असते. प्रत्येक पाहुण्याचं वैयक्तिक स्वागत करणे, सर्वांसोबत फोटो काढणे आणि पार्टीनंतर स्वतः गेटपर्यंत येऊन पाहुण्यांना निरोप देणे ही त्याची खासियत आहे. या पार्टीच्या आतल्या फोटोंची सोशल मीडियावर फारशी झलक मिळत नाही, कारण मन्नतमध्ये मीडियाला परवानगी नसते. मात्र पार्टीच्या शेवटी शाहरुख स्वतः बाहेर येऊन फोटोग्राफर्ससाठी पोज देतो, ज्यामुळे चाहत्यांना त्याची एक झलक मिळते.
सध्या शाहरुख खान ‘मन्नत’च्या रेनोव्हेशनवर पूर्ण लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे यावर्षी दिवाळीचा पारंपरिक जल्लोष आणि सेलिब्रिटींची गर्दी पाहायला मिळणार नाही. पण त्याच्या चाहत्यांना आशा आहे की पुढच्या वर्षी तो पुन्हा एकदा एका भव्य आणि लक्षवेधी दिवाळी पार्टीसह पुनरागमन करेल. जशी की त्याची ओळख आहे. शाहरुख खानसारख्या मोठ्या सेलिब्रिटीने पारंपरिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेणं हे सहज नसतं, पण कधी कधी गरजेच्या गोष्टींसाठी अशा बदलांना सामोरं जावं लागतं. यंदा दिवाळी ‘मन्नत’मध्ये नाही, पण चाहत्यांच्या मनात मात्र शाहरुखचा उत्सव तेवढाच उजळून निघेल.











