‘कांटा लगा…’ गर्ल शेफाली जरीवाला हिचं वयाच्या ४२ व्य़ा वर्षी कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं. तिच्या निधनानंतर चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. शेफाली नियमित व्यायाम करीत होती. तसं पाहता तिचा फिटनेसही चांगला होता. अशा परिस्थितही तिला अचानक कार्डिअॅक अरेस्ट येण्यामागील कारण काय याचाही तपास केला जात आहे.
दरम्यान अनेक ठिकाणी शेफालीचा मृत्यू हॉर्ट अटॅकमुळे झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र प्रत्यक्षात शेफालीचा मृत्य़ू कार्डिअॅक अरेस्टमुळे झाला आहे. या दोन्हीमुळे फरक आहे.

हार्ट अटॅक म्हणजे काय?
हृदयापर्यंत रक्तप्रवाह सुरळितपणे पोहोचत नसेल तर त्याला हार्ट अटॅक आला असं म्हटलं जातं. अनेकदा या प्रकरणात एखाद्याच्या छातीवर हात ठेवून प्रेशर दिलं जातं. ज्यातून हृदयाला रक्तप्रवास पुरविण्यास सुरुवात होऊ शकते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हृदयापर्यंत रक्ताचा प्रवाह थांबतो ज्यामुळे हृदय काम करणे बंद करते. ज्यामुळे हार्ट अटॅक येतो.
हार्ट अटॅकमध्ये हृदयाची धडधड सुरू असते. हृदयाच्या मांसपेशीला रक्तपुरवठा होत नसला तरी हार्ट अटॅकमध्ये शरीराच्या इतर अवयवांना रक्तपुरवठा होत असतो. हार्ट अटॅकमध्ये व्यक्ती शुद्धीत असते.
ही आहेत हार्ट अटॅकची लक्षणं…
छातीत अस्वस्थता
छातीत दुखणे
मळमळ
हृदयात जळजळ
अपचन किंवा पोटदुखी
थकवा
सूज
सतत थंडी वाजणे
हातदुखी
चक्कर येणे
घसा किंवा जबड्यात वेदना
कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे काय?
या प्रकरणात व्यक्तीचं हृदय शरीराला रक्त पंप करणं थांबवते. अधिकतर प्रकरणात रुग्ण बेशुद्ध होतो. कार्डिअॅक अरेस्टमध्ये हृदयाला रक्तपुरवठा होता, मात्र हृदय रक्त पंप करणं किंवा पाठवू शकत नाही. ज्यामुळे शरीराच्या दुसऱ्या अवयवांपर्यंत रक्त आणि ऑक्सिजन पोहोचणं बंद होतं. अशात शरीरातील इतर अवयव काम करणं बंद होतं. हृदयाची धडधड बंद होते, त्यामुळे व्यक्ती श्वास घेऊ शकत नाही.
कार्डिअॅक अरेस्टची लक्षणं काय आहेत?
अचानक बेशुद्ध होणे
अचानक कोसळणे
हृदयाचे ठोके अचानक वाढणे
नाडी आणि रक्तदाब कमी होणे
श्वास घेण्यास त्रास











