सध्या श्रावण महिना सुरु असून या महिन्याला पवित्र महिना मानलं जातं. श्रावणातील उपवास सोडताना अभिनेत्री तनुश्री दत्ताने मटण खाल्लं आहे. त्याचा व्हिडीओ तिने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. यावरून नेटकरी तिच्यावर भडकले आहेत. परंतु ट्रोलर्सना तनुश्रीने सडेतोड उत्तर दिलं आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केली पोस्ट
तनुश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट आणि व्हिडीओ शेअर केला. या पोस्टमध्ये ती म्हणाली की, “माझं अन्न माझ्यासाठी औषधासारखं आहे.” तिने मटणाची चरबी वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये दाखवत त्याचे फायदे सांगितले. ती पुढे म्हणाली, “जर कोणी मानसिक आरोग्याशी झुंजत असेल, तर त्याने अन्नावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.” “असा उपवास माझ्यासाठी सर्वोत्तम आहे. उपवाससुद्धा होतो, उपवासाने मानसिक शक्ती वाढते आणि मग उपवास सोडताना हाय प्रोटीन आणि पौष्टिक भोजनसुद्धा खाल्लं जातं. त्यामुळे शरीरसुद्धा नेहमी निरोगी राहतं.

ट्रोलर्सना तनुश्रीने दिलं सडेतोड उत्तर
या पोस्टवर लोकांनी अभिनेत्रीवर टीका करायला सुरुवात केली. एका युजरने लिहिले, श्रावणात नॉनव्हेज…. खूप छान मॅडम.’ एकाने लिहिले, ‘श्रावणात तुम्ही हे काय दाखवत आहात?’ एकाने लिहिले, ‘ मॅडम शाकाहारी व्हा. तुमचे सर्व आरोग्य ठीक राहील.’ एकाने लिहिले, ‘श्रावण… उपवास… मटण… फॅट.’ तर आणखी एकाने लिहिले की जर श्रावणात मटण खायचंच होतं तर उपवास तरी का धरायचा… यावर तनुश्रीने उत्तर दिले, ‘बंगालमध्ये सर्व उपवास असेच पाळले जातात. आम्ही संध्याकाळपर्यंत फक्त पाण्यावर उपवास करतो आणि नंतर सूर्यास्तानंतर देवीला दिलेला नैवेद्य खातो ज्यात बकरीचे मांस असते. प्रत्येकाची संस्कृती वेगळी आहे, कोणावरही मत बनवू नये. संपूर्ण व्हिडीओ पहा आणि त्यानंतर टिप्पणी द्या. इथं धार्मिक लोक फक्त त्यांच्या दुष्ट विचारणीसह येतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)