अभिनेत्री सोनम कपूर अनेकदा सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. यावेळी, अभिनेत्रीने तिचे केस कापले आहेत आणि ते केस दान करून एक अनोखे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे तिचे कौतुक होत आहे. अभिनेत्रीने तिच्या लांब केसांसाठी वडील अनिल कपूर यांचे आभार मानले, ज्याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर देखील शेअर केला.
सोनम कपूरने १२ इंच लांब केस दान केले
सोनम कपूरने सोमवारी तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती सलूनमध्ये तिचे केस कापताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती हसताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना अभिनेत्री म्हणाली, ‘माझे १२ इंच केस कापले आहेत. व्हिडिओमध्ये ते लहान दिसत असतील, पण प्रत्यक्षात ते एक फूट लांब आहेत. यासोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी माझे १२ इंच केस लहान करून ते दान करण्याचा निर्णय घेतला आहे. इतक्या सुंदर जीन्ससाठी अनिल कपूर यांचे आभार”.

नेटिझन्स प्रतिक्रिया देत आहेत
हा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांकडून अभिनेत्रीचे कौतुक करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने म्हटले, ‘सोनम, तुझा नवीन हेअरकट खूपच छान दिसतोय.’ तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की खूप सुंदर केस. दुसऱ्या एका युजरने म्हटले की, तिने केस दान करून इतका मोठा त्याग केला, हे खूप कौतुकास्पद कृत्य आहे. याशिवाय, इतर युजर्सनी म्हटले, व्वा, इतके लांब केस”.
सोनम कपूरचं बालिवूड करिअर
अभिनेत्री सोनम कपूरने २००७ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर ती ‘दिल्ली-६’, ‘आय हेट लव्ह स्टोरीज’ आणि ‘आयशा’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. ही अभिनेत्री शेवटची २०२३ मध्ये आलेल्या ‘ब्लाइंड’ चित्रपटात दिसली होती.